महत्त्वाच्या बैठकीत असे काय घडले, राहुल गांधी थेट बाहेर पडले?
संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले. (Rahul Gandhi, Cong members walk out of Defence panel meeting)
नवी दिल्ली: संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीत सैन्य दलातील जवानांचे ड्रेस बदलण्याच्या चर्चेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी चांगलेच भडकले. जवानांना कशा पद्धतीचा गणवेश असावा हे समितीतील खासदार ठरवू शकत नाहीत. तो आपला अधिकार नाही, सैन्य दलांच्या प्रमुखांनाच गणवेशाबाबतचा निर्णय घेऊ द्यावा, असं सांगत राहुल गांधी यांनी या चर्चेला विरोध केला. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जुएल ओरम आणि राहुल गांधी यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे संतापलेल्या राहुल यांनी या समितीच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. (Rahul Gandhi, Cong members walk out of Defence panel meeting)
संरक्षण विषयक संसदीय समितीचे अध्यक्ष जुएल ओरम यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी उपस्थित होते. लष्कर, हवाई दल आणि नौदलातील जवानांसाठी नव्या स्टाईलचा ड्रेस देण्याबाबतची चर्चा यावेळी करण्यात आली. त्यावेळी भाजपच्या एका खासदाराने अमेरिकन स्टाईलचे ड्रेस जवानांना देण्याची सूचना केली.
भाजप खासदाराच्या या सूचनेला राहुल गांधी यांनी तीव्र विरोध केला. आजच्या बैठकीला लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी बसले आहेत. त्यामुळे सुरक्षा दलांच्या जवानांचा ड्रेस कसा असावा? याचा निर्णय त्या त्या दलाच्या प्रमुखांनी घेतला पाहिजे. सुरक्षा दल आणि त्यांच्या युनिटला गौरवाची मोठी परंपरा आहे, त्यामुळे त्यांनाच हा निर्णय घेऊ द्यावा, अशी सूचना राहुला गांधी यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Rahul Gandhi, Cong members walk out of Defence panel meeting)
आपण राजकारणी, तो आपला अधिकार नाही
बैठकीत बसलेले आपण सर्वजण राजकारणी आहोत आणि सुरक्षा दलाचा ड्रेस किंवा बॅचचा निर्णय घेण्याचा आपला अधिकार नाही. हा निर्णय सुरक्षा दलावरच सोपवण्यात यावा, असंही राहुल यांनी सांगितलं. पण ओरम यांनी राहुल गांधी यांना बोलण्यापासून मज्जाव केला. त्यामुळे तुम्ही माझ्या म्हणण्याचा विरोध करू शकता, पण मला माझं म्हणणं तर मांडू द्या, असं राहुल म्हणाले. त्यावर कुणाला बोलू द्यायचं आणि कुणाला नाही, याचा मला अधिकार आहे, असं अध्यक्षांनी सांगितलं. त्यामुळे संतापलेल्या राहुल गांधींनी अध्यक्षांच्या या भूमिकेला विरोध करून बैठकीतून सभात्याग केला. राहुल गांधी यांच्यानंतर समितीतील काँग्रेसचे सदस्य राजीव सातव आणि रेवंथ रेड्डी यांनीही वॉकआऊट केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Rahul Gandhi, Cong members walk out of Defence panel meeting)
VIDEO : SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 December 2020https://t.co/ge1xN8zwui
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 16, 2020
संबंधित बातम्या:
आम्हाला RSS चं हिंदुत्व मान्य नाही, भाजपविरुद्ध दोन हात करण्यास तयार, ममता कडाडल्या
‘आम्ही तुमच्या सारख्या खोट्या कोरोना टेस्ट करत नाही’, केजरीवाल योगींवर भडकले
साखरेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा
(Rahul Gandhi, Cong members walk out of Defence panel meeting)