सरकारनं चीनच्या सैनिकांना सीमेवर रोखण्याऐवजी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवलं: राहुल गांधी

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या  (Agriculture Acts) विरोधात राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. (Rahul Gandhi farm laws)

सरकारनं चीनच्या सैनिकांना सीमेवर रोखण्याऐवजी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवलं: राहुल गांधी
राहुल गांधी, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 5:42 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींनी ( Rahul Gandhi) पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या  (Agriculture Acts) विरोधात राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवर अडवणे हे नसून चीनला देशाच्या सीमांवर रोखणे हे होते, अशा शब्दांमध्ये गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी केंद्र सरकारला अहंकारी आणि अयोग्य म्हटलंय. (Rahul Gandhi criticised Narendra Modi Government over farm laws)

राहुल गांधी यांचे ट्विट

राहुल गांधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पहिल्यापासून आक्रमक भूमिका घेत आहेत. यावेळी राहुल गांधींनी चीनच्या सैनिकांनी भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवरुन केंद्रावर निशाणा साधला. केंद्र सरकारचं काम शेतकऱ्यांना दिल्लीच्या सींमावर रोखणे हे नसल्याचं म्हटलं आहे.

दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. केंद्र सरकारनं शेतकरी आंदोलानाल ज्या पद्धतीनं हाताळलं आहे. त्यावरुन विरोधी पक्ष केंद्रावर निशाणा साधत आहेत.

शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

केंद्र सरकारनं लागू केलेले कृषी कायदे मागे घ्यावेत यासाठी पंजाब, हरियाणाचे शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये 11 चर्चेच्या फेऱ्या निष्फळ झाल्या आहेत.

राज्यातील शेतकरी मुंबईत पोहोचले

केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघठनातर्फे आझाद मैदान येथे मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. नाशिकवरून शेतकऱ्यांचा मोठा जथ्था मुंबईत पोहोचत आहे. राज्याच्या इतर भागातून सुद्धा शेतकरी पोहोचत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मोर्चामध्ये उद्या हजर राहणार असून, काँग्रेस तर्फे बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाला समर्थन दिले असल्याचं प्रकाश रेड्डी यांनी म्हणाले.

संबंधित बातम्या: 

सोनिया गांधींच्या नेतृत्वावर विश्वास नाही का? CWC बैठकीत अशोक गेहलोत आक्रमक

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

(Rahul Gandhi criticised Narendra Modi Government over farm laws)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.