राहुल गांधी यांनी काँग्रेसच्याच खासदाराकडे का दुर्लक्ष केले?; व्हिडीओ होतोय व्हायरल

गेल्या अनेक वर्षांत जनता कोणत्याही मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी पुढे आली नाही. शेतकरी आंदोलनात, सीएएच्या निषेधाच्या वेळीही जनतेने साथ दिली नाही, फक्त मुस्लिम विरोध करण्यासाठीच पुढे आले आहेत.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्याच खासदाराकडे का दुर्लक्ष केले?; व्हिडीओ होतोय व्हायरल
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:51 AM

नवी दिल्ली: काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या राजकीय वक्तव्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावरही अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असतात.कधी त्यांच्या काही घटनांचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर कधी ते कशा पद्धतीने बोलतात त्याही गोष्टीही व्हायरल होत असतात.आताही त्यांचा आणखी एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

मात्र राहुल गांधी संसद भवनात काँग्रेस खासदारांच्या बैठकीला गेले होते. त्यावेळी काँग्रेसचे अनेक नेते त्यांचे स्वागत करत आहेत.

तर त्याचवेळी कार्ती चिदंबरमही तिथे उभे होते, मात्र ते चिदंबरम यांच्याकडे न पाहता ते तिथून निघून गेले आहेत. तर संसदेच्या पायऱ्यांवर ते समोर उभे होते.

राहुल इतर नेत्यांशी हस्तांदोलन करत त्यांच्या शुभेच्छाही स्वीकारत ते पुढे गेले आहेत. मात्र कार्ती चिंदबरम समोर असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते पुढं निघून गेले आहेत. तर त्याचवेळी चिदंबरमही एकटेच बाहेर जात असल्याचे दिसून येत आहे.

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि म्हणतात की काँग्रेसमध्ये गांधी असण्याची ही हक्काची भावना आणि अहंकार त्यांच्या पतनास कारणीभूत ठरणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांना लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवल्यानंतर लोकांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचे पी चिदंबरम यांनी मान्य केले असतानाच राहुल यांनी कार्तीसोबत असे वर्तन केल्याचेही मालवीय यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर एका मुलाखतीत चिदंबरम म्हणाले होते की, गेल्या अनेक वर्षांत जनता कोणत्याही मुद्द्यावर आंदोलन करण्यासाठी पुढे आली नाही. शेतकरी आंदोलनात, सीएएच्या निषेधाच्या वेळीही जनतेने साथ दिली नाही, फक्त मुस्लिम विरोध करण्यासाठीच पुढे आले आहेत.

दुर्दैवाने, आपण स्वातंत्र्यलढ्याच्या दिवसांपासून खूप पुढे आलो आहोत जेव्हा मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीय लोक गांधीजींच्या लढ्यात सामील होत होते.

त्यामुळे आता राहुल गांधींचा हा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांना काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले आहे. यावर काँग्रेसच्या सोशल मीडिया अध्यक्षा सुप्रिया श्रीनाटे यांनी ट्विट करत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.