अदानींना अटक करा, राहुल गांधींची मागणी, पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

"आम्हाला माहिती आहे की सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींच्या पाठिशी आहेत. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करत आहेत", असे राहुल गांधी म्हणाले

अदानींना अटक करा, राहुल गांधींची मागणी, पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 1:38 PM

Rahul Gandhi demand to Arrest Gautam Adani : अमेरिकेच्या सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) अदानी उद्योग समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक करणे तसेच सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणे, असे आरोप गौतम अदानींवर करण्यात आले आहेत. याप्रकरणी अदानी यांचे भाचे सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी तसेच एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवरही आरोप लावण्यात आले आहेत. यावरुन आता अदानी समूह हा अडचणीत आला आहे. त्यातच आता या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी केली आहे. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी अदानींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

“भाजप सरकार अदानींना वाचवेल”

“गौतम अदानी फसवणूक प्रकरणावर आम्ही गप्प बसणार नाही. हा मुद्दा आम्ही संसदेतही मांडणार आहोत. भाजप सरकार अदानींना वाचवेल, हेही आम्हाला माहिती आहे. अदानी यांनी २ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे, तरीही त्यांना अटक केली जात नाही, असे अमेरिकन तपास संस्थेने म्हटले आहे. अदानी आताही तुरुंगाबाहेर का आहेत? त्यांना तात्काळ अटक करावी. त्यांच्यावरील आरोपांची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी”, असे राहुल गांधी म्हणाले.

“अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील”

“जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतमी अदानी एकत्र आहे, तोपर्यंत ते सुरक्षित आहेत. आम्हाला माहिती आहे की सरकार अदानींवर कोणतीही कारवाई करणार नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानींच्या पाठिशी आहेत. ते त्यांचे पूर्णपणे संरक्षण करत आहेत. अदानी जेलमध्ये गेले तर पंतप्रधान मोदीही जातील. भाजपचा निधी अदानीशी जोडलेला आहे”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

“अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करतात”

“गौतम अदानींवर जे घोटाळ्याचे आरोप झाले आहेत, ते मी केलेले नाहीत. अदानींची चौकशी झाली पाहिजे. अदानी भारतात रोज भ्रष्टाचार करत आहेत. संपूर्ण देश अदानींच्या ताब्यात आहे”, असाही घणाघात राहुल गांधींनी केला.

Non Stop LIVE Update
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?
मुंबईत सर्वाधिक मतदान 'या' मतदारसंघात तर सर्वात कमी मतदान कुठे?.
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'
सत्ता स्थापनेबाबत महायुतीच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, 'गरज पडल्यास..'.
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.