Rahul Gandhi : राहुल गांधींचा के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्लाबोल; तेलंगणातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचं मोठं आश्वासन
राजा जनतेचा आवाज ऐकत नाही, त्याला जे करायचं असतं ते तो करतो. तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाहीत. तेलंगणाचे शेतकरी मिर्ची आणि धानाला चांगली किंमत मागत आहेत आणि त्यांचं कर्ज माफ करायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.
नवी दिल्ली : तेलंगणात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आज तेलंगणात (Telangana) मुख्यमंत्री आहेत मात्र हे मुख्यमंत्री नाही तर राजा आहेत. राजा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय फरक असतो? मुख्यमंत्री जनतेचा आवाज ऐकतो. तर राजा जनतेचा आवाज ऐकत नाही, त्याला जे करायचं असतं ते तो करतो. तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाहीत. तेलंगणाचे शेतकरी मिर्ची आणि धानाला चांगली किंमत मागत आहेत आणि त्यांचं कर्ज माफ (Farmer loan waiver) करायला हवं, असं राहुल गांधी म्हणाले.
‘शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करणार’
तेलंगणात काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतच कर्ज माफ करणार आणि योग्य आधारभूत किंमत देणार, अशी घोषणाच राज ठाकरे यांनी केलीय. इकडे शेतकऱ्या विधवा रडत आहेत, ही जबाबदारी कुणाची? एक नाही तेलंगणात अशा हजारो भगिनी आहेत, ज्यांच्या पतीने आत्महत्या केलीय. ही जबाबदारी कुणाची? असा सवाल राहुल गांधी यांनी केलाय. इतकंच नाही तर निवडणुकीत काँग्रेसचं तिकीट योग्यतेच्या आधारावर दिलं जाईल. तुम्ही कितीही शक्तीशाली असाल, कितीही मोठे असाल, जर तुम्ही गरीबांच्या, शेतकऱ्यांच्या सोबत नाहीत, तर तुम्हाला काँग्रेसचं तिकीट मिळणार नाही, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.
Congress ticket in polls will be given on a merit basis, regardless of how powerful you are, or how big you are. If you are not with the poor, farmers, you will not get the Congress ticket: Congress leader Rahul Gandhi in Warangal, Telangana pic.twitter.com/L7PvyJ9rmU
— ANI (@ANI) May 6, 2022
केसीआर यांच्यावर जोरदार टीका
राहुल गांधी यांनी तेलंगनाच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. भाजपला माहिती आहे की काँग्रेस त्यांच्यासोबत कधीही तडजोड करणार नाही. त्यामुळेच ते तेलंगणात टीआरएस सरकार आणण्याच्या प्रयत्न करतेय. त्याचा परिणाम असा होईल की, तेलंगणाचे मुख्यमंत्री पाहिजे तेव्हा पैसा चोरू शकतील आणि केंद्र सरकार त्यांच्या मागे ईडीची पिडा लावणार नाहीत. राहुल गांधी हे सध्या तेलंगणाच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांनी त्यांच्या उस्मानिया विद्यापीठाच्या दौऱ्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. राहुल गांधी यांनी कधीही तेलंगणाच्या बाजुने भूमिका घेतली नाही. मग ते वारंगल आणि उस्मानिया विद्यापीठात का जात आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.
LIVE: In solidarity with the farmers of Telangana, addressing #RaithuSangharshanaSabha in Warangal https://t.co/TepCgoGs0o
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 6, 2022