Parliament Monsoon Session: तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. (Pegasus hacking controversy)

Parliament Monsoon Session: तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला
राहुल गांधी
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 12:16 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी Pegasus सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. तुमच्या फोनमधील ते काय वाचत आहेत आम्हाला माहीत आहे, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी Pegasus सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय मीडियाने केला आहे. इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर Pegasusचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं आहे. (Rahul Gandhi took a jibe at the government over the Pegasus hacking controversy)

मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे.

संसदेत आवाज उठवणार

राज्यसभेत सीपीआय नेते बिनॉय विश्वम, राजद खासदार मनोज झा, आपचे खासदार संजय सिंहसहीत अनेक खासदारांनी या विषयावर चर्चा करण्याची राज्यसभेत मागणी केली आहे. आमची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही हा मुद्दा संसदेत उचलून धरू, असं काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं.

पेगासस सॉफ्टवेअर कसं काम करतं?

पेगासस एक मेलवेअर असून त्याद्वारे आयफोन आणि अँड्रॉईड डिव्हाईस हॅक करता येतं. मेलवेअर पाठवणारा व्यक्ती मोबाईलमधील मेसेज, फोटो आणि ई-मेल पाहू शकतो. एवढंच नव्हे तर त्या फोनवर येत असलेल्या कॉलचं रेकॉर्डिंगही करू शकतो. या सॉफ्टवेअरद्वारे फोनच्या माईकला गुप्तरित्या अॅक्टिव्ह केलं जातं.

केंद्र सरकारचं म्हणणं काय?

केंद्राकडून लोकांवर अशा पद्धतीने लक्ष ठेवण्यात येत असल्याचं वृत्त केंद्र सरकारने फेटाळून लावलं आहे. याबाबतचा कोणताही ठोस पुरावा किंवा आधार नाही. भारताची लोकशाही लवचिक आहे. देशातील नागरिकांचा गोपनियतेचा अधिकार हा मौलिक अधिकार म्हणून त्याचं सरकारडून संरक्षण केलं जात आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं.

दरम्यान, हा डेटा सर्वात आदी पॅरिसमधील मीडिया, एनएसओ फॉरबिडन स्टोरीज आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशलनकडे लीक होऊन आला होता. त्यानंतर तो रिपोर्टिंग कन्सोर्टियमच्या रुपात वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियनसहीत 17 मीडियांसोबत शेअर करण्यात आला होता. लीक झालेल्या डेटामध्ये 50000 फोन नंबरची यादी आहे. 2016 पासून एनएसओकडून पेगासस सॉफ्टवेअरद्वारे या लोकांची हेरगिरी केली जात असल्याचं सांगितलं जात आहे. (Rahul Gandhi took a jibe at the government over the Pegasus hacking controversy)

संबंधित बातम्या:

लस घ्या, बाहुबली बना; पंतप्रधान म्हणतात, संसदेत प्रश्न विचारा, पण उत्तरं देण्याची संधीही द्या

फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी खुलासा करायला हवा; राऊतांची मागणी

Navjot Singh Sidhu : काँग्रेसचा मोठा निर्णय, अंतर्गत संघर्षानंतर पंजाब प्रदेशाध्यक्षपदी अखेर नवज्योतसिंह सिद्धू

(Rahul Gandhi took a jibe at the government over the Pegasus hacking controversy)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.