AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधी VS अमित शाह, लोकसभेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नेमकं काय घडलं?

महिला आरक्षणाच्या विधेयकावर लोकसभेत आज चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी भूमिका मांडत असताना केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलं.

राहुल गांधी VS अमित शाह, लोकसभेत महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 7:16 PM

नवी दिल्ली | 20 सप्टेंबर 2023 : लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर चर्चा झाली. यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयकावर भूमिका मांडली. विशेष म्हणजे महिला आरक्षणाच्या विधेयकावर भूमिका मांडत असताना राहुल गांधींनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यालाही हात घातला. यावेळी त्यांनी सरकारवर चांगलाच निशाना साधला. भाजपचा जातीय जनगणनेपासून लक्ष वळवण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपच राहुल गांधी यांनी यावेळी केला. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या विविध संस्थांमध्ये कार्यकर्त असलेल्या 90 सचिवांपैकी किती सचिव ओबीसी समाजाचे आहेत? असा सवाल केला. तसेच 90 पैकी फक्त 3 सचिव हे ओबीसी आहेत, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांनी आक्रमक भाषण केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रत्युत्तर देण्यासाठी उभे राहिले. त्यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. देशासाठी कालचा दिवस ऐतिहासिक ठरला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मांडलं. हे विधेयक आणल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मनापासून आभार मानतो”, असं अमित शाह म्हणाले.

राहुल गांधी यांच्या आरोपांना अमित शाह यांचं उत्तर

“जेवढ्या SC/ST च्या जागा आहेत त्यातले एक तृतीयांश जागा त्यांनाही आरक्षित होऊन जातील”, असं उत्तर अमित शाह यांनी राहुल गांधी यांना दिलं. “या देशाची माता, मातृशक्ती, बेटी नितीनिर्धारण करेल. काही पक्षांसाठी महिला सशक्तिकरण एक राजकीय अजेंडा असू शकतो. काही पक्षांसाठी हा एक राजकीय मुद्दा असू शकतो. हा नारा निवडणूक जिंकण्याचं हत्यार असू शकतं. पण माझ्या पक्षासाठी आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी महिला सशक्तिकरण हा राजकिय मुद्दा नाही”, असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी संघटनेचं काम करत होते. गुजरातचे महासचिव होते. तेव्हाच्या कार्यकारणीत मोदींच्या मागणीमुळे भाजपच्या संघटनेत महिलांना 33 टक्के आरक्षण दिलं गेलं. मुख्यमंत्री असताना मोदींना देशाच्या जनतेनं पंतप्रधान म्हणून निवडलं. जेव्हा मोदी गुजरातचे पंतप्रधान होते तेव्हा बेटी पढाओचा नारा दिला गेला”, असं अमित शाह यांनी सांगितलं.

‘मोदी सरकारने 70 टक्के बँक अकाउंट महिलांच्या नावे काढले’

“मोदींच्या खात्यात मुख्यमंत्रीपद सोडताना जे पैसे होते ते वर्ग 3 आणि 4 च्या कर्मचाऱ्यांच्या शिक्षणासाठी दिले. हा आमच्यासाठी फक्त राजकीय नाही तर कार्यशक्तीचा मुद्दा आहे. महिलांसाठी सुरक्षा, सन्मान हे मोदींनी शपथ घेतल्यापासून श्वास आणि प्राण बनले आहेत. जेव्हा मोदी देशाचे पंतप्रधान बनले तेव्हा 70 कोटी लोकांच्या घरी बँक अकाऊंट नव्हते. मोदींनी 52 कोटी बँक आकाऊंट खोलले. त्यातले 70 टक्के अकाउंट महिलांच्या नावे काढले”, असं अमित शाह यांनी सांगितलं.

अमित शाह यांचा काँग्रेसवर निशाणा

“काँग्रेसने या देशात 5 दशकापेक्षा जास्त काळ राज्य केलं. पण गरिबांसाठी काही काम केलं नाही. साधी शौचालयाचीही सोय त्यांच्या काळात नव्हती. मोदींनी पहिल्या 5 वर्षातच 11 कोटी 72 लाख शौचालये बांधले. महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी हे आरक्षण घेऊन आम्ही आलो आहोत”, असं अमित शाह म्हणाले.

“मी कोणत्याही पक्षाविरोधात बोलणार नाही. अनेक संधी मिळतील तिथं राजकीय उत्तर देता येईल. हे काय पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक आलं नाही. देवेगौडा यांच्यापासून मनमोहन सिंह यांच्यापर्यंत अनेकवेळा विधेयक आलं. मग ते पारित का होऊ शकलं नाही?”, असा सवाल त्यांनी केला.

“मी देशातील कोट्यवधी महिलांना सांगू इच्छितो की, जेव्हा देवेगौडा यांनी बिल आणलं तेव्हा काँग्रेस विरोधी पक्षात बसत होती. अटलजी पंतप्रधान असताना हे विधेयक पुन्हा मांडल गेलं होतं. मनमोहन सिंह पंतप्रधान असताना राज्यसभेत पारीत झालं”, असं अमित शाह म्हणाले.

कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू
पाकिस्तानला पाण्याचा थेंबा-थेंबासाठी तरसवण्याची तयारी सुरू.
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन
अगर जंग छिडी तो..', मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन.
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल
पाकिस्तानला तुर्कीएचा उघड पाठिंबा; कराची बंदरात युद्धनौका दाखल.
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार
हवाईदलाची ताकद वाढणार, HAPS खरेदी करणार; माणसाशिवाय गुप्त माहिती कळणार.
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर
वैभवी देशमुखला 85.33 टक्के; वडिलांच्या आठवणीने अश्रु अनावर.
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी
भारतानं पाकचं पाणी रोखल, खळखळून वाहणाऱ्या 'चिनाब'ची अवस्था नाल्यासारखी.
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट
2 आणि 5 वर्षांची मुलं पाकिस्तानात, आई भारतात; अटारी सीमेवर ताटातुट.
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश
काँग्रेस फोडा, खाली करा... ते आपल्याकडे.. भाजपच्या बड्या नेत्याचा आदेश.
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद
युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद.