काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवळपास राहुल गांधीच निश्चित; सोनियांच्या बैठकीतून मोठा निर्णय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. (rahul gandhi will be next party president: sources)

काँग्रेसच्या अध्यक्षपदी जवळपास राहुल गांधीच निश्चित; सोनियांच्या बैठकीतून मोठा निर्णय?
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 3:56 PM

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडेच पक्षाचे अध्यक्षपद देण्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची बैठक सुरू असून या बैठकीत राहुल गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी लावून धरल्याने त्यावरच या बैठकीत प्रामुख्याने चर्चा सुरू असून राहुल यांच्याकडेच पक्षाची सूत्रे देण्यावर जवळपास एकमत झाल्याचंही सूत्रांनी सांगितलं. (rahul gandhi will be next party president: sources)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी पक्षाची बैठक सुरू आहे. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच ही बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेसमधील संघटनात्मक बदल करण्याची मागणी करणाऱ्या 23 नेत्यांसह माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, ज्येष्ठ काँग्रेस नेते ए. के. अँटनी, पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, भूपिंदरसिंग हुड्डा, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, हरीश रावत यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत बिहार निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करतानाच पश्चिम बंगाल आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्याची मागणी अनेक वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. पक्षातील नेत्यांची ही मागणी सोनिया गांधी यांनी गंभीरपणे घेतली असून त्यांनीही राहुल यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याचे जवळपास निश्चित केल्याचं बोललं जात आहे.

एकाही नेत्याचा विरोध नाही

आजच्या बैठकीला काँग्रेसचे 23 नाराज नेते उपस्थित आहेत. या पैकी एकाही नेत्याने राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास विरोध केला नाही. त्यामुळे राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. तसेच आजच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाल्याने नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यात सोनिया गांधी यांना यश आल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

सुरजेवाला काय म्हणाले होते?

सोनिया गांधींसोबत काँग्रेसच्या नाराज नेत्यांची बैठक होण्याच्या काही तास आधीच राहुल गांधी हेच पक्षाध्यक्ष व्हावेत असं 99.9 टक्के काँग्रेस नेत्यांना वाटतं, असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं होतं. सोनिया गांधींसोबत चर्चेला येणाऱ्या नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी सुरजेवाला यांनी हे विधान केल्याचं बोललं जात होतं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला या नेत्यांकडून विरोध होऊ नये आणि पक्षाध्यक्षपदासाठी गैरगांधी नाव पुढे येऊ नये म्हणून सुरजेवाला यांनी ही खेळी खेळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत राहुल यांच्या नेतृत्वाचा विषय आल्यावर त्याला या 22 नेत्यांनी विरोध केला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पक्ष देईल ती जबाबदारी घेणार: राहुल

यावेळी राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याची चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनाही त्यांचे मत विचारण्यात आले. तेव्हा पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचं सांगत राहुल यांनीही अध्यक्ष होण्याची तयारी दर्शविल्याचं सूत्रांनी सांगितलं. (rahul gandhi will be next party president: sources)

संबंधित बातम्या:

 काँग्रेससाठी ऐतिहासिक दिवस; ते ‘स्पेशल 23’ इतिहास घडवणार की विजनवासात जाणार?

पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; सोनिया गांधींना ‘या’ नेत्याने दिला सल्ला

सोनियांचं उद्धव ठाकरेंना पत्र, पण काय आहे त्यात? वाचा महाराष्ट्र प्रभारी काय सांगतायत?

(rahul gandhi will be next party president: sources)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.