Rail Accident : रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; हावडा-मुंबई ट्रेनचे 18 डब्बे घसरले, दोघांचा मृत्यू, मृत आणि जखमींचा आकडा किती?

Howrah-Mumbai Train : रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. आता हावडा-मुंबई ट्रेनचे 18 डब्बे रुळावरुन घसरल्याने काहींना जीव गमवावा लागला तर कित्येक जण जखमी झाले. अपघाताचे वृत्त धडकताच यंत्रणा कामाला लागली आहे. बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहचले आहे.

Rail Accident : रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; हावडा-मुंबई ट्रेनचे 18 डब्बे घसरले, दोघांचा मृत्यू, मृत आणि जखमींचा आकडा किती?
रेल्वे अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 8:57 AM

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. गेल्या दोन वर्षांत पूर्वोत्तर भागात मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. त्यात आता आणखी एका अपघताची भर पडली आहे. हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरली. या रेल्वेचे सर्व डब्बे रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात दोन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

भल्या पहाटे अपघाताची माहिती

हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे प्राण

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. याविषयीची अद्ययावत माहिती लवकरच समोर येईल. पण चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.

अनेक रेल्वे रद्द

या अपघातानंतर या मार्गावरील हावडा टिटलागडसह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयासोबतच टीएमएच, मेडिकल कॉलेज आणि जमशेदपूरच्या सदर हॉस्पिटललाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मालगाडीला धडक मिळालेल्या माहितीनुसार, हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेसच्या काही बोगी रुळावरून घसरल्या आणि जवळच उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्या. या अपघातात काही प्रवासी जखमी झाल्याच्या वृत्ताला रेल्वे अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. जखमींना चक्रधरपूर येथील रेल्वे रुग्णालयात आणण्यात येत आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....