Railway Accident | हा तर मृत्यूचा प्रवास, इतक्या जणांना गमवावे लागले रेल्वे अपघातात प्राण

Railway Accident | बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वे अपघात झाला. त्यात चार प्रवाशांना मृत्यू ओढावला, 200 प्रवाशी जखमी झाले आहेत. देशात गेल्या काही वर्षांच्या रेल्वे अपघातांच्या मालिकेवर नजर टाकल्यास, हा प्रवास किती सुरक्षित आहे, असे प्रश्नचिन्ह निर्माण होते. रेल्वे अपघातात मरणाऱ्यांची आकडेवारी चिंताजनक आहे.

Railway Accident | हा तर मृत्यूचा प्रवास, इतक्या जणांना गमवावे लागले रेल्वे अपघातात प्राण
Follow us
| Updated on: Oct 12, 2023 | 10:27 AM

नवी दिल्ली | 12 ऑक्टोबर 2023 : बिहारच्या बक्सर जिह्यातील रुळावरुन रेल्वे घसरल्याने अपघात झाला. नॉर्थ ईस्ट एक्सप्रेसला हा अपघात झाला. दिल्लीहून ही रेल्वे कामाख्याला जात होती. अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू ओढावला. तर 200 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री हा अपघात घडला. देशातील रेल्वे अपघातांची मालिका बघितल्यास हा प्रवास खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न उभा ठाकतो, गेल्या सात-आठ वर्षांतील याविषयीची आकडेवारी विचार करायला लावणारी आहे. यापूर्वी जून महिन्यात झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या अपघाताने तर थरकाप उडला होता. त्यावेळी 291 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.

  1. सर्वात मोठा अपघात – ओडिशाच्या बालासोरजवळ तीन रेल्वे गाड्या एकमेकांना धडकून भीषण रेल्वे अपघात 2 जून 2023 रोजी घडला होता. या रेल्वे अपघतात मयतांचा आकडा 291 वर गेला होता. तर हजारो प्रवासी जखमी झाले होते. हा मोठा भीषण अपघात होता. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप पूर्वीपासून होत होता. याप्रकरणात काही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. भारतात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच असल्याचे दिसून येते.
  2. ट्रॅकवरील गर्दीला उडवले – पंजाबच्या दसरा उत्सावाला गालबोट लागले होते. रात्री रावण दहनाचा कार्यक्रम सुरु होता. रेल्वे ट्रॅकवर गर्दी उसळली होती. त्यावेळी रेल्वे लोकांना चिरडत पुढे गेली होती. या अपघातात 59 जणांचा मृत्यू ओढावला होता तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. 19 ॲाक्टोबर 2018 रोजी हा अपघात झाला होता.
  3. डब्बे घसरल्याने मृत्यू – बिहारमधील मध्यरात्रीच्या घटनेप्रमाणेच आंध्र प्रदेशमधील विजयनगरममध्ये हा अपघात घडला होता. 22 जानेवारी 2017 रोजी हिराखंड एक्सप्रेसचे 8 डब्बे घसरल्याने 39 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते.
  4. 150 जणांचा मृत्यू – कानपूरजवळील पुखरायमध्ये रेल्वे डब्बे घसरल्याने 150 जणांचा मृत्यू ओढावला होता. 20 नोव्हेंबर 2016 रोजी पटणा-इंदूर एक्सप्रेसचे 14 डब्बे रेल्वे रुळावरुन घसरले होते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. जनता एक्सप्रेस – 20 मार्च 2015 रोजी जनता एक्सप्रेस रुळावरुन घसरली होती. त्यात 34 प्रवासांना प्राण गमवावे लागले होते. ही रेल्वे देहरादूनवरुन वाराणसीला जात होती.
  7. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर – ही रेल्वे नागोठाणे ते रोहा या दोन रेल्वे स्टेशनदरम्यान रुळावरुन घसरली होती. यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 प्रवाशी जखमी झाले होते. 4 मे 2014 रोजी हा अपघात झाला होता.

30 अब्ज डॉलरची गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात रेल्वे बजेट बंद झाले. पण रेल्वेच्या विकास कामांसाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे विकास आणि पूनर्निर्माण कार्यासाठी 30 अब्ज डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनचा अमुलाग्र बदल, मॉडेल रेल्वे स्टेशन, अत्याधुनिक रेल्वे, सुपरफास्ट रेल्वे यांचा समावेश आहे. तसेच सुरक्षित रेल्वे प्रवासासाठी अनेक सुधारणा करण्यात येत आहे. नवीन रुळासाठी, रुळ बदलविण्यासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.