Railway Board CEO : भारतीय रेल्वेला मिळाली पहिली महिला अध्यक्ष! जया वर्मा आहेत तरी कोण

Railway Board CEO : भारतीय रेल्वेत पहिल्यांदा इतिहास घडला. रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी एका महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सदस्य असलेल्या जया वर्मा यांची बोर्डाच्या सीईओ पदी वर्णी लावण्यात आली आहे. याविषयीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाला नवीन चेहरा मिळाला आहे.

Railway Board CEO : भारतीय रेल्वेला मिळाली पहिली महिला अध्यक्ष! जया वर्मा आहेत तरी कोण
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 3:48 PM

नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : पहिल्यांदा भारतीय रेल्वेने एखादा महिलेला अध्यक्ष आणि सीईओ पदी (Indian Railway Board CEO) नियुक्ती दिली आहे. रेल्वेच्या 105 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा महिलेला अध्यक्ष पद मिळाले आहे. जया वर्मा (Jaya Verma) यांची रेल्वेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी, 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या नावाची या पदासाठी घोषणा करण्यात आली होती. त्यांनी 1 सप्टेंबर 2023 रोजी या पदाची सूत्रं हाती घेतली. जया वर्मा यापूर्वी रेल्वे बोर्डाच्या सदस्य होत्या. रेल्वे बोर्डात त्यांच्या खाद्यांवर व्यवसाय विकास आणि व्यवस्थापनाची जबाबदारी होती. भारतीय रेल्वेत जया वर्मा यांनी 35 वर्षांची सेवा बजावली आहे. यानंतर त्यांना रेल्वेच्या अध्यक्ष आणि सीईओ पदाची जबाबदारी देण्यात आली.

कोण आहेत जया वर्मा

जया वर्मा यांचे शिक्षण अलाहाबाद महाविद्यालयातून झाले आहे. भारतीय रेल्वे दळणवळण सेवा 1986 च्या बॅचपासून त्या भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेशी जोडल्या गेल्या. त्या रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमार लोहाटी यांच्या जागी येतील. रेल्वे बोर्डाची पहिली महिला सदस्य विजयलक्ष्मी विश्वनाथन या होत्या. तर जया वर्मा या रेल्वे बोर्डाच्या पहिला महिला अध्यक्ष आणि सीईओ झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

कुठे झाले शिक्षण

जया वर्मा सिन्हा यांचा जन्म प्रयागराज येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि पदवी, पदव्युत्तर पदवी त्यांनी प्रयागराज येथून घेतली. त्यांचे वडील व्ही. बी. वर्मा सीएजी कार्यालयात सनदी अधिकारी होते. त्यांचा मोठा भाऊ पण सनदी अधिकारी आहे. निवृत्तीनंतर वर्मा कुटुंबिय लखनऊमध्ये स्थायिक झाले.

नोकरीची सुरुवात

जया वर्मा यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या 1988 मध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (IRTS) रुजू झाले. वर्मा प्रशिक्षणानंतर 1990 मध्ये कानपूर मध्यवर्ती स्टेशनवर सहायक वाणिज्य व्यवस्थापक म्हणून निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांचे एक ही आंदोलन झाले नाही.

रेल्वेकडे मोठे बजेट

भारतीय रेल्वेला आर्थिक वर्ष 2023-24 या दरम्यान आतापर्यंत सर्वाधिक बजेट मिळाले. सर्वाधिक निधी मिळाला. रेल्वेला चालू आर्थिक वर्षांत 2.4 लाख कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या रेल्वे बोर्डाचा कार्यभार आता जया वर्मा सांभाळणार आहेत.

1988 पासून दळणवळण अधिकारी

जया वर्मा सिन्हा 1988 बॅचपासून भारतीय रेल्वे दळणवळण सेवेत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी भारतीय रेल्वे बोर्डात सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यांच्याकडे व्यवसाय विकास आणि व्यवस्थापन ही जबाबदारी होती. आता त्या बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ झाल्या आहेत. आज 1 सप्टेंबरपासून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. जया वर्मा सिन्हा यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण होईल.

किती मिळेल पगार

भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांचा पगार सध्या जवळपास 2.25 लाख रुपये प्रति महिना आहे. याशिवाय त्यांना अनुषांगिक भत्ते, घर आणि इतर अनेक लाभ देण्यात येतात. रेल्वे सेवेविषयी निर्देश देणे, विकास आणि इतर आवश्यक निर्णय घेणे रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षाचे हे प्रमुख काम आहे.

Non Stop LIVE Update
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे
मी शिंदे साहेबांना वाशीतच सांगितले होते...काय म्हणाले मनोज जरांगे.
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?
अजित पवार गटातले आमदार राजेंद्र शिंगणे हाती तुतारी घेणार ?.
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?
भारत आणि कॅनडा संबंध आणखी बिघडले,बिष्णोई टोळीशी काय कनेक्शन ?.
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक
दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,अमित शाहसोबत अंतिम बैठक.
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील
आमचं सरकार आलं तर बहि‍णींना तीन हजार रुपये देणार - गुलाबराव पाटील.
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री
'लाडकी बहीण योजना' बंद करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम - मुख्यमंत्री.
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस
ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला ते आम्हाला कायदा...काय म्हणाले फडणवीस.
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा
लाडकी बहिण कोणाची ?महायुतीत श्रेयवाद सुरुच, तीन पक्षात स्पर्धा.