रेल्वेच्या ग्रुड डी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना आनंदाची बातमी, पात्रता निकष केले शिथील, पाहा काय बदल केले
Railway Group D Jobs: रेल्वे बोर्डाने ग्रुप डी नोकऱ्यांसाठीचे पात्रता निकष अत्यंत सुलभ केले आहेत, ग्रुप डीच्या भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता सोपी झाल्याने आता तांत्रिक पदांशिवाय इतर पदांसाठी पात्रता निकष बदलेले आहेत.
सध्याच्या बेकारीच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकारी नोकरी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. अनेक जण सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताना दिसतात. अशात जर सरकारी नोकरीसाठीच्या अटी शिथील केल्या असतील तर उमेदवारांना हे सोन्याहून पिवळे अशी संधी आता निर्माण झाली आहे. आता रेल्वेच्या ग्रुप डी पदांकरीता अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या पदासाठी शैक्षणिक अर्हता आता शिथील केलेली आहे.
रेल्वेने बोर्डाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या लेव्हल १ च्या पदांसाठी ( आधी ग्रुप डी ) भरतीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता आता शिथील केली आहे. नव्या नियमांनुसार आता आता उमेदवारांना १० उत्तीर्ण असण्यासोबत ज्यांच्याकडे आयटीआय आहे. किंवा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने (एनसीव्हीटी) जारी केलेले राष्ट्रीय अप्रेनटिस प्रमाणपत्र ( एनएसी ) National Apprenticeship Certificate(NAC) समकक्ष योग्यता आहे ते सर्वजण या पदासाठी अर्ज करु शकणार आहेत.
पात्रता मानदंड
2 जानेवारी रोजी सर्व झोनल रेल्वेना पाठवविलेल्या पत्रात रेल्वेने बोर्डाने म्हटले आहे की पात्रता निकष अद्ययावत करण्याचा निर्णय पूर्वीच्या निर्णयाच्या जागा घेणार आहे.
रेल्वे बोर्डाने ग्रुप डीच्या अटी शिथील केल्या
रेल्वे बोर्डाने ग्रुप डीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता सोपी केली आहे. आता आयटीआय प्रमाणपत्राची गरज नाही. तांत्रिक विभागासाठी अर्ज करणाऱ्यांनाचे इयत्ता दहावी उत्तीर्ण सोबत एनएसी किंवा आयआयटी डिप्लोमा आवश्यक राहणार आहे.
भरती प्रक्रिया या तारखांपासून सुरु
लेव्हल -१ पदांमध्ये विविध विभागातील सहाय्यक, पॉईंट्समन आणि ट्रॅक मेन्टेनर्स यांचा समावेश आहे. रेल्वे बोर्डाने अलिकडेच घोषणा करुन सुमारे ३२ हजार लेव्हल – १ ( ग्रुप डी ) पदाची खुली भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया २३ जानेवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत सुरु रहाणार आहे.