AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हीही हिटर वापरत असाल तर सावध व्हा… रात्रभर हिटर सुरू राहिल्याने लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्यासह तिघांचा…

थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण हीटरचा वापर करतात. मात्र त्याचा अतीवपार आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. अशाच हीटरचा वापर करणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले. रात्रभर हीटर सुरू ठेवून झोपलेले असताना, त्या हीटरमुळे आग लागून...

तुम्हीही हिटर वापरत असाल तर सावध व्हा... रात्रभर हिटर सुरू राहिल्याने लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्यासह तिघांचा...
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Dec 25, 2023 | 1:16 PM
Share

जयपूर | 25 डिसेंबर 2023 : सध्या थंडीचा मौसम सुरू आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्लीत तर थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण हीटरचा वापर करतात. मात्र त्याचा अतीवपार आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. अशाच हीटरचा वापर करणे राजस्थानमधील एका कुटुंबाच्या जीवावर बेतले. रात्रभर हीटर सुरू ठेवून झोपलेले असताना, त्या हीटरमुळे आग लागून एका कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला. त्यामध्ये बाप-लेकीचा जागीच जीव गेला, तर जखमी महिलेने उपचारांदरम्यान प्राण सोडले. अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीचाही यात जीव गेल्याने हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

राजस्थानच्या अलवर येथे ही दुर्दैवी घटना घडली. अवघ्या दोन वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज झालेल्या दांपत्याला दोन महिन्यांपूर्वीच मुलगी झाली. घरात आनंदाच वातावरण होतं. घटनेच्या दिवशी गावात खूपच थंडी होती. पती-पत्नी आपल्या दोन महिन्यांच्या निरागस मुलीसह खोलीत झोपले होते. थंडीपासून वाचण्यासाठी त्यांनी खोलीत हीटर लावला होता. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हीटरला अचानक आग लागली आणि बघता बघता तिचा भडका उडून ती पसरली. खोलीत आगीने रौद्ररूप धारण केले , त्यामुळे होरपळलेल्या वडील व मुलीचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमीमहिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण कुटुंबाने प्राण गमावले.

अवघ्या दोन महिन्यांच्या लेकीमुळे घरात पसरला होता आनंद

ही दुर्दैवी घना शेखपूर ठाणे क्षेत्रातील मुंडाना गावातील आहे. तेथे राहणाऱ्या दीपकने जयपूरच्या संजू यादवसोबत 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. त्यामुळे सगळे आनंदात होते. त्या रात्री दीपक आणि संजू मुलीस खोलीत झोपले होते, हीटरही सुरू होता. रात्री अचानक हिटरमध्येआ ग लागली. त्यामुळे दीपक आणि त्यांची मुलगी निशिका यांचा जागीच मृत्यू झाला, तर संजू ही महिला गंभीर भाजली.

कपड्यांना लागलेली आग बघता बघता पसरली

त्यांना उपचारासाठी अलवर येथील राजीव गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांचा मृत्यू झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जास्त हीटिंदमुळे हीटरला आग लागल्याचे ग्रामस्थ आणि पोलिसांनी सांगितले. यानंतर आग झपाट्याने पसरत रजईपर्यंत पोहोचली. आणि सगळ्या खोलीत रौद्र रूप धारण केले.

किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांनी घेतली धाव पण…

यामुळे खोलीत झोपलेले तिघेही आगीच्या भक्ष्यस्थानी अडकले. त्यांच्या किंकाळ्या, आरडाओरडा ऐकून गावातील लोकांनी घटनास्थळी पटकन धाव घेतली. मात्र तोपर्यंत संपूर्ण खोली जळून खाक झाली होती. गावकऱ्यांनी तिघांनाही कसेबसे बाहेर काढले. गंभीररित्या होरपळलेल्या वडील आणि अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता, तर महिला 80 टक्क्यांहून अधिक भाजली होती. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, असे अतिरिक्त एसपी तेजपाल सिंह यांनी सांगितले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.