Chief Election Commissioner : राजीव कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती; 15 मे रोजी स्वीकारणार पदभार
राजीव कुमार यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियमांनुसार, निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल ते) आहे. कुमार यांचा जन्म फेब्रुवारी 1960 रोजी झाला असल्याने त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत आहे. म्हणजेच पुढील विधानसभा निवडणुकीपासून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहे.
नवी दिल्ली : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) पदी राजीव कुमार यांचे नाव घोषित झाले आहे. ते आपल्या पदाचा पदभार 15 मे रोजी स्वीकारतील. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली असून विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील चंद्रा हे 14 मे रोजी निवृत्त होत आहेत. राजीव कुमार हे 1984 च्या बॅचचे आयएएस (IAS)अधिकारी आहेत. 2 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. तर ते 15 मे 2022 ते 18 फेब्रुवारी 2025 या कालावधीत देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सांभाळतील. घटनेनुसार निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ हा सहा वर्षे किंवा वयाच्या ६५ वर्षापर्यंत असतो. भारत सरकारच्या (Government of India) 36 वर्षांहून अधिक सेवा करताना, राजीव कुमार यांनी केंद्रातील विविध मंत्रालयांमध्ये आणि बिहार/झारखंडच्या त्यांच्या राज्य केडरमध्ये काम केले आहे. B.Sc, LLB, PGDM आणि MA पब्लिक पॉलिसीची शैक्षणिक पदवी असलेले राजीव कुमार यांना सामाजिक क्षेत्र, पर्यावरण आणि वन, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रांमध्ये कामाचा मोठा अनुभव आहे.
Rajiv Kumar has been appointed as the Chief Election Commissioner with effect from 15th May. pic.twitter.com/csUlIZwQib
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 12, 2022
भारत सरकारचे वित्त सचिव म्हणून निवृत्त
अधिक पारदर्शकता, तंत्रज्ञान अनुप्रयोगांच्या वितरणासाठी विद्यमान धोरणामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांची गहन वचनबद्धता आहे. राजीव कुमार फेब्रुवारी 2020 मध्ये भारत सरकारचे वित्त सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यानंतर एप्रिल 2020 ते 31 ऑगस्ट 2020 रोजी पद सोडेपर्यंत सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. राजीव कुमार हे 2015 पासून कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे आस्थापना अधिकारी देखील राहिलेल आहेत. राजीव कुमार हे भारतीय शास्त्रीय आणि भक्ती संगीतात प्रचंड रुची असलेले ट्रेकर आहेत. त्यांनी हिमालयातील लडाख, हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम इत्यादी, पश्चिम घाट, पालघाट इत्यादी ठिकानांवरील अनेक खिंडी पार केल्या आहेत.
राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका
राजीव कुमार यांची 1 सप्टेंबर 2020 रोजी निवडणूक आयोगात आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. नियमांनुसार, निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ सहा वर्षांचा किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत (जे आधी असेल ते) आहे. कुमार यांचा जन्म फेब्रुवारी 1960 रोजी झाला असल्याने त्यांचा कार्यकाळ 2025 पर्यंत आहे. म्हणजेच पुढील विधानसभा निवडणुकीपासून 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत राजीव कुमार यांच्या देखरेखीखाली होणार आहे.