राजपथ झाला कर्तव्यपथ, नेताजी सुभाषचंद्र यांच्या प्रतिमेचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, गुलामीची चिन्हे मिटली, नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाने देशाला एक नवी प्रेरणा मिळाली आहे. नवी ऊर्जा आली आहे. भूतकाळ सोडून आता भविष्याचे नवे रंग आपल्या सगळ्यांसमोर आहेत. एक नवी आभा दिसते आहे. ती नव्या भारताचा आत्मविश्वास आहे.
नवी दिल्ली– पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एका भव्य कार्यक्रमात सेंट्रल विस्टा एव्हेन्यूचे (Central vista)उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्तव्य पथावर असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchanda Bose)यांच्या प्रतिमेचेही अनावरण केले. नेताजींची ही प्रतिमा २८ फूट उंच आहे. ही प्रतिमा ग्रेनाईटपासून तयार करण्यात आली आहे. इंडिया गेटवर ज्या ठिकाणी अमर जवान ज्योत होती, त्याच ठिकाणी या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रिटिशांच्या काळात कर्तव्य पथ किंग्सवेने जॉर्ज पंचम यांच्या सन्मानासाठी बांधला होता. किंग्सवेचे नाव बदलून त्यानंतर राजपथ असे ठेवण्यात आले होते. आता राजपथाचे नाव बदलून ते कर्तव्यपथ असे करण्यात आले आहे.
यावेळी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाने देशाला एक नवी प्रेरणा मिळाली आहे. नवी ऊर्जा आली आहे. भूतकाळ सोडून आता भविष्याचे नवे रंग आपल्या सगळ्यांसमोर आहेत. एक नवी आभा दिसते आहे. ती नव्या भारताचा आत्मविश्वास आहे.
- गुलामीचे प्रतिक असलेला किंग्सवे म्हणजेच राजपथ, आता इतिहास झाला आहे. कायमचा संपुष्टात आला आहे. आज कर्तव्य पथाच्या रुपाने नव्या इतिहासाचे सर्जन झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात गुलामीच्या आणखी एका आठवणीपासून मुक्तीसाठी सगळ्यांचे अभिनंदन करतो.
- आज इंडिया गेटजवळ आपल्या राष्ट्रनायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विशाल मूर्ती स्थापन केलेली आहे. गुलामीच्या काळात या ठिकाणी ब्रिटिशांच्या राजसत्तेच्या प्रतिनिधींची प्रतचिमा लागलेली होती. आज देशाने त्याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची प्रतिमा स्थापन करुन आधुनिक, सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे.
- सुभाषचंद्र बोस हे असे महामानव होते की ते कोणत्याही पदांच्या आणि आव्हानांच्या पलिकडचे होते. संपूर्ण विश्व त्यांना नेता मानत असे. त्यांच्यात साहस आणि स्वाभिमान होता. त्यांच्याकडे विचार आणि दूरदृषअटी होती. त्यांच्याकडे नेतृत्वाची क्षमता होती, धोरणे होती.
- जर स्वातंत्र्यांनतर देश सुाभषचंद्र बोस यांच्या मार्गावर चालला असता, तर देश आणखी मोठ्या उंचीवर राहिला असता. मात्र दुर्दैवाने या महानायकाचा स्वातंत्र्यानंतर विसर पडला. त्यांच्या विचारांकडे, प्रतिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
- गेल्या आठ वर्षांत आमच्या सरकारच्या काळात घेतलेल्या अनेक निर्णयांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आदर्शांची आणि स्वप्नांची छाप आहे. नेताजी हे भारताचे पहिले प्रधान होते, ज्यांनी १९४७च्या पूर्वी अंदमानला स्वतंत्र करत, स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवला होता.
- त्यावेळी लाल कल्ल्यावर तिंरगा फडकण्याची अनुभूती त्यांनी कल्पनेतून घेतली होती. त्या अनुभूतीचा अनुभव मी स्वता घेतला आहे.
- आज भारताचे आद्रश आपले आहेत, नवे आयाम आपले आहेत. भारताचे संकल्प आणि लक्ष्यही आपले आहेत. पथ आणि प्रतिकेही आपली आहेत. किंग जॉर्ज यांच्या मूर्तीऐवजी नेताजी यांची मूर्ती बसवणे, हे गुलामीच्या मानसिकतेचा त्याग करण्यासारखे आहे. ही पहिले उदाहरण आहे. ही ना सुरुवात आहे, ना अंत आहे.
- इंग्रजांच्या काळापासून सुरु असलेले अनेक कायदे आता बदललेले आहेत. भारतीय बजेट जे ब्रिटिंशांचे अनुकरम करीत होते, त्याची तारीखही बदलण्यात आली आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणातून परदेशी भाषांपासूनही युवकांची सुटका केलेली आहे.
- या नव्या कर्तव्यपथाला येऊन पाहा, असे आवाहन साऱ्या भारतीयांना करतो. यात तुम्हाला भविष्यातील भारत दिसेल. या ठिकाणची ईर्जा विराट राष्ट्राची व्हिजन तुम्हाला देईल. एक नवा विश्वास देईल.
हे सुद्धा वाचा