AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखमोलाची बातमी ! वराने जे केले त्यामुळे वधूपित्याच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

अमरसिंह यांचा विवाह नागौर जिल्ह्यातील हुडिल गावातील प्रेमसिंह शेखावत यांची मुलगी बबिता कंवरसोबत २२ फेब्रुवारी रोजी झाला. त्यावेळी अमरसिंह यांनी हुंडा न घेण्याचा निर्णय जाहीर केला.

लाखमोलाची बातमी ! वराने जे केले त्यामुळे वधूपित्याच्या डोळ्यात आले आनंदाश्रू
लग्न प्रथा
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 11:24 AM

नागौर : लग्नात (marriage function ) अनेक जुन्या रुढी, परंपरा अनेक समाजात आहे. त्यातील चांगल्या परंपरांचे कौतूक केले जाते. परंतु काही परंपरा देखावे, श्रीमंती दर्शवत असतात. मग अनेक वधूपिता या बनावटी देखाव्यांमुळे कर्जबाजारी होतात. त्यात काळानुसार बदल गरजेचा आहे. परंतु पुढे कोणी येत नाही. राजस्थानमधील राजपूत समाजातील (Rajput community) एक धाडसी व कौतूकास्पद निर्णय समोर आला आहे. नागौर जिल्ह्यातील हुडील गावात झालेल्या लग्नात अनोखी घटना घडली.  या निर्णयाचे समाजातून कौतूक होत आहे. टिळा प्रथा बंध करण्याचे आवाहन केले जात आहे.

नेमके काय झाले

हे सुद्धा वाचा

वधू पित्याने टिळा लावण्याच्या कार्यक्रमात दिलेले 11 लाख 51 हजार रुपये वराने परत केले. त्यानंतर वधूच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. वराने केवळ एक रुपया आणि नारळ शगुन घेऊन लग्न केले. हे दृश्य पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. हे लग्न गावातच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरले.

धाडसी निर्णय

नागौर जिल्ह्यातील जैतरण तहसीलच्या सांगास तंवरो येथील रहिवासी अमरसिंह तन्वर. अमरसिंह यांचा विवाह नागौर जिल्ह्यातील हुडिल गावातील प्रेमसिंह शेखावत यांची मुलगी बबिता कंवरसोबत २२ फेब्रुवारी रोजी झाला. त्यावेळी अमरसिंह यांनी हुंडा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. अमरसिंह यांचा विवाह नागौर जिल्ह्यातील हुडिल गावातील प्रेमसिंह शेखावत यांची मुलगी बबिता कंवरसोबत २२ फेब्रुवारी रोजी झाला. त्यावेळी अमरसिंह यांनी हुंडा न घेण्याचा निर्णय जाहीर केला. अमरसिंह यांच्या विवाहाची मिरवणूक निघाली होती.

मिरवणुकीनंतर वर लग्नमंडपाजवळ आला. टिळा लावण्याच्या प्रथेचा कार्यक्रम सुरु झाला. टिळासाठी वधूपित्याने 11 लाख 51 हजार रुपये दिले. परंतु ते अमरसिंह यांनी ते परत केले. केवळ एक रुपया आणि नारळ घेत राजपूत समाजात चांगला आदर्श निर्माण केला.

3 पिढ्या देशाची सेवा करत आहे

अमरसिंह यांचे कुटुंबातील तीन पिढ्या लष्करात आहे. त्यांचे वडील भंवर सिंग तन्वर लष्करी अधिकारी आहे. अमरसिंह लष्करात आहे. तो उत्तराखंडमधील डेहराडून येथील लष्करी तळावर हवालदार म्हणून कार्यरत आहे. त्यांचे कुटुंब तीन पिढ्यांपासून सैनिक म्हणून काम करून देशसेवा करत आहे. अमर सिंह यांचे वडील भंवर सिंग लष्करात सुभेदार मेजर होते. त्याचे आजोबा दादा बहादूर सिंग यांनीही भारत-पाकिस्तान युद्ध 1971 आणि भारत-चीन युद्ध 1965 मध्ये देशाची सेवा केली होती.

राजपूत समाजाला आवाहन – टीकाची प्रथा बंद करा

मुलगी ही कोणत्याही गरीब कुटुंबास ओझे होऊ नये यासाठी समाजातील टिळाची प्रथा बंद करण्याचे आवाहन तंवर राजपूत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.