शेतकऱ्यांविरुद्ध जगातील सर्वात मोठं षडयंत्र सुरु; राकेश टिकैतांचा आरोप
काही पक्षाची लोक येऊन पोलिसांसोबत शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतात, त्यापासून शेतकऱ्यांना कोण वाचवणार?, असा सवाल राकेश टिकैतांनी केला. (Rakesh Tikait)
नवी दिल्ली: भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी कृषी कायदे (Farm laws) आणि शेतकरी आंदोलनाविषयी (Farmers Protest) जी अडचण आहे त्यावर आम्ही भारत सरकराशी चर्चा करु, असं म्हटलंय. सध्या जे काही सुरु आहे ते सर्व शेतकऱ्यांविरुद्ध षडयंत्र आहे. यापेक्षा मोठं षडयंत्र जगात होऊच शकत नाही. पोलिसांनी आमच्यावर लाठीचार्ज करावी काही हरकत नाही. पण, काही पक्षाची लोक येऊन पोलिसांसोबत शेतकऱ्यावर लाठीचार्ज करतात, त्यापासून शेतकऱ्यांना कोण वाचवणार?, असा सवाल राकेश टिकैत यांनी केला. (Rakesh Tikait said Government did conspiracy with farmers)
शेतकऱ्यांच्या मोर्चात दुसऱ्या लोकांना घुसवून शेतकऱ्यांची प्रतिमा खराब केली गेली. या प्रतिमेला धुतलं जाईल, साफ केल जाईल. हा शेतकरी आता मागे हटणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होईल आणि सरकारला आमच्या मान्य कराव्याचं लागतील, असं राकेश टिकैत म्हणाले.
लाल किल्ल्यापर्यंत एक माणूस तिकडे वर पोहचतो कसा?
26 जानेवारीला जे झालं ते भाजपाचं एक षडयंत्र होतं. जे काही झाल ते षडयंत्रानुसार झालं, असा आरोप टिकैत यांनी केला. लाल किल्ल्यापर्यंत एक माणूस तिकडे वर पोहचतो कसा? तिकडे धार्मिक झेंडा त्याने कसा काय लावला ? दोन तास तो माणूस तिकडे होता. पोलिसांनी त्याच्यावर का कारवाई केली का नाही, का गोळी चालवली नाही?, अशा प्रश्नांची सरबत्ती राकेश टिकैत यांनी दिल्ली पोलिसांवर केली आहे. 144 कलम आम्ही मानत नाही. मी सर्व सहन करेल पण त्या आधी सरकारशी चर्चा करणार आहे. शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान परत मिळवून देईल आणि सगळ मान्य झाल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन होईल, असंही ते म्हणाले. आम्ही शांततापूर्ण पद्धतीनं रॅली काढली होती. जो रस्ता मागितला गेला तो दिला नाही. जो दिला गेला त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं, असं टिकैत म्हणाले.
आता आम्ही अजून सक्षम झालो आहोत. सरकारने आमच्यासोबत गद्दारी केली आहे. आम्ही सरकारला सगळी उत्तर देऊ, ही लढाई संपणार नाही उलट अजुन मजबुतीने चालेल. हे आंदोलन दहापट ताकदीनं चालवू, असंही टिकैत म्हणाले. भाजपचे दोन आमदार 400 लोकांसह येतात शेतकऱ्यांच्यावर लाठीचार्ज करतात. त्यांना काही केलं जात नाही, असा सवाल टिकैत यांनी केला.
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/8emnQKg2p5
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 29, 2021
संबंधित बातमी:
‘कृषी कायदे परत घेतले नाही, तर आत्महत्या करेन,’ शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा इशारा
(Rakesh Tikait said Government did conspiracy with farmers)