Stampede In Mahakumbh: अयोध्येतही कोट्यवधी भाविक, प्रयागराज महाकुंभासारखी परिस्थिती, राम मंदिर ट्रस्टला करावे लागले न येण्यासाठी अपील
Stampede In Mahakumbh: सध्या अयोध्येजवळ राहणाऱ्या भाविकांनी राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत येणे टाळावे. त्यांनी शक्य असल्यास 15-20 दिवसांनी बसंत पंचमीनंतर अयोध्येत येण्याचे नियोजन करावे. कारण एका दिवसात करोडो भाविकांना रामललाचे दर्शन देणे अत्यंत अवघड आहे.
![Stampede In Mahakumbh: अयोध्येतही कोट्यवधी भाविक, प्रयागराज महाकुंभासारखी परिस्थिती, राम मंदिर ट्रस्टला करावे लागले न येण्यासाठी अपील Stampede In Mahakumbh: अयोध्येतही कोट्यवधी भाविक, प्रयागराज महाकुंभासारखी परिस्थिती, राम मंदिर ट्रस्टला करावे लागले न येण्यासाठी अपील](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/Ram-Mandir.jpg?w=1280)
Stampede In Prayagraj Mahakumbh: प्रयागराजमधील महाकुंभात मौनी अमावस्याच्या अमृत स्नानापूर्वी मोठी दुर्घटना घडली. या अमृतस्नानासाठी पाच कोटी भाविक प्रयागराजमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे बुधवारी रात्री दीड वाजता चेंगराचेंगरी झाली. त्यात काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. विविध आखाड्यांनी स्वता:हून आपले अमृत स्नान रद्द केले. प्रयागराजसारखी गर्दीची परिस्थिती अयोध्या आणि काशीत निर्माण झाली आहे. प्रचंड गर्दीमुळे अयोध्येतील राम मंदिर 18 तास सुरु ठेवले आहे. भाविकांची रांग 20 किलोमीटरपर्यंत गेली आहे. त्यामुळे राम मंदिर ट्रस्टने भाविकांना पुढील 15 दिवस अयोध्येत न येण्याचे आवाहन केले आहे.
अयोध्येत न येण्याचे आवाहन
प्रयागराजमधील भाविकांच्या प्रचंड गर्दीचा परिणाम उत्तर प्रदेशातील इतर धार्मिक शहरांमध्ये झाला आहे. अयोध्येतील राम मंदिर, काशी-विश्वनाथ मंदिर आणि चित्रकूट या ठिकाणी भाविकांची गर्दी वाढली आहे. यामुळे रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चपंत राय यांनी भाविकांना अपली केली आहे. महाकुंभातून अयोध्येकडे येणाऱ्या भाविकांना राम मंदिरात न येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी अयोध्येची असहायता व्यक्त केली. ते म्हणाले की, अयोध्या धामची लोकसंख्या करोडो भाविकांना हाताळण्यास असमर्थ आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Padmshree-Baba.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/pakistan-launch-satellite.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/sc-hsc-maharashtra-board-hall-ticket.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Narayan-Rane.jpg)
आदरणीय भक्तजन,
जय श्री राम!
प्रयागराज में दिनांक 29 जनवरी को कुम्भ में मौनी अमावस्या का मुख्य स्नान है। अनुमान है कि लगभग 10 करोड श्रद्धालु दिनांक 29 जनवरी को प्रयागराज में स्नान करेंगे। बहुत बड़ी संख्या में प्रयागराज से भक्तजन अयोध्या जी पहुंच रहे हैं। ट्रेन एवं सड़क दोनों…
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) January 28, 2025
चंपत राय यांनी याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या अयोध्येजवळ राहणाऱ्या भाविकांनी राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत येणे टाळावे. त्यांनी शक्य असल्यास 15-20 दिवसांनी बसंत पंचमीनंतर अयोध्येत येण्याचे नियोजन करावे. कारण एका दिवसात करोडो भाविकांना रामललाचे दर्शन देणे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंत्रणांमध्ये योग्य ते बदल करणे गरजेचे झाले आहे. अयोध्येतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा संगम नाक्यावर चेंगराचेंगरीची घटना उघडकीस आल्याने राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सरचिटणीसांची भीती खरी ठरली. त्यांनी 29 जानेवारीला म्हणजेच मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजमध्ये संगम स्नान करण्यासाठी 10-12 कोटींचा जनसमुदाय जमणार असल्याचे म्हटले होते.