Guinness world Record : ‘रामचरितमानस’ ने केला वर्ल्ड रेकॉर्ड! गिनीज बुकात नोंदवले नाव, कारण तरी काय

Guinness world Record : गोस्वामी तुलसीदास यांच्या श्री राम चरित मानसचे गारुड उत्तर भारतावरच नाही तर संपूर्ण देशावर आहे. आता रामचरितमानसचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे...

Guinness world Record : 'रामचरितमानस' ने केला वर्ल्ड रेकॉर्ड! गिनीज बुकात नोंदवले नाव, कारण तरी काय
Image Credit source: media
Follow us
| Updated on: May 25, 2023 | 10:17 AM

नवी दिल्ली : गोस्वामी तुलसीदास यांच्या श्री राम चरित मानसचे (Ramcharitmanas) गारुड उत्तर भारतावरच नाही तर संपूर्ण देशावर आहे. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रामचरित मानसवरुन राजकीय वादंग झाले. अनेक दिवस रामचरितमानसच्या काही ओव्यांचा आधार घेत हा वाद घालण्यात आला. पण आता रामचरितमानसच्या आधारे एक जागतिक विक्रम करण्यात आला आहे. आता रामचरितमानसचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guinness Book Of World Record) नोंदवले गेले आहे. वाराणशीचे डॉ. जगदीश पिल्लई यांच्या विशेष प्रयत्नाने रामचरितमानस हे जागतिक पटलावर पोहचले आहे. गिनीज बुक 15 व्या शतकात गोस्वामी तुलसीदास महाराजांनी श्री राम चरित मानस रचले आणि तेव्हापासून त्याचे गारुड भारतीय जनमानसावर आरुढ झाले आहे. सोप्या शब्दांचा ठाव हे या महाकाव्याचे वैशिष्ट्ये आहे.

काय आहे वर्ल्ड रेकॉर्ड डॉक्टर पिल्लई यांनी रामचरितमानस हे सुगम काव्य 138 तास 41 मिनिटे आणि 2 सेकंद गायिले आणि जगातील सर्वात मोठे गाने म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली. त्यामुळे रामचरितमानस आता अधिकृतरित्या जगातील सर्वात मोठे गाने झाले आहे. इतके प्रदीर्घ गाणे अजून झालेले नाही.

असा तयार केला रेकॉर्ड जगातील अनेक ऑडिओ चॅनलवर डॉ. पिल्लई यांनी रामचरितमानसचे गायन केले. पाच वर्षानंतर पाचव्यांदा त्यांना यश आले आणि डॉ. जगदीश पिल्लई यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविल्या गेले. हे काम पूर्ण करण्यासाठी चार वर्षांची मेहनत घ्यावी लागली. यापूर्वी सर्वात मोठे गाणे गाण्याचा रेकॉर्ड अमेरिका आणि ब्रिटन येथील गायकांच्या नावे होता. आता हा बहुमान डॉ. पिल्लई यांच्या नावावर आहे.

हे सुद्धा वाचा

नवीन धून केली तयार गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या श्री रामचरितमानस या सुगम काव्यातील ओव्यांची डॉ. पिल्लई यांनी एक धून तयार केली. भजन आणि किर्तनाची त्यासाठी त्यांनी मदत घेतली. त्याआधारे 138 तास 41 मिनिटे आणि 2 सेकंदाचं मोठे गाणे तयार झाले. हे तुलसीकृत रामायण त्यांनी एप्पल म्युझिक, स्पॉटीफाई, अॅमेझॉन म्युझिक अशा प्लॅटफॉर्मवर पण प्रसारित केले आहे.

यापूर्वीचे गाणे कोणते यापूर्वी जगातील सर्वात मोठे गाणे हे ब्रिटनच्या तरुणांच्या नावे होते. हे गाणे 115 तास 45 मिनिटांचे होते. 1 डिसेंबर 2021 रोजी हे गाणे तयार झाले. ब्रिटन येथील सेंट एल्ब्स येथे हा विश्व विक्रम झाला. मार्क क्रिस्टोफर आणि द पॉकेट गॉड्स या नावावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला होता. हे एक प्रकारचे वाद्य काव्य होते. त्यानंतर मोठ्या कष्टाने डॉ. पिल्लई यांनी महाकाव्य जागतिक पलटावर आणले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.