रामदास आठवलेंकडून शशी थरुर यांना इंग्रजीचे धडे, आठवलेजी तुमची जेएनयूमध्ये गरज, थरुर यांच्याकडून स्पेलिंगमधील गफलत मान्य
शशी थरुर यांनी रामदास आठवले यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं. रामदास आठवलेंनी शशी थरुर यांच्या ट्विटमधील इंग्रजी शब्दातील स्पेलिंगमधील चुका शोधल्या आणि थरुर यांचं ट्विट रीट्विट करत खास अंदाजात उत्तर दिलं.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते खासदार शशी थरुर (Shahi Tharur) आणि आरपीआयचे नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यात इंग्रजीवरुन ट्विटवर वॉर रंगलं. शशी थरुर यांनी रामदास आठवले यांना उद्देशून एक ट्विट केलं होतं. रामदास आठवलेंनी शशी थरुर यांच्या ट्विटमधील इंग्रजी शब्दातील स्पेलिंगमधील चुका शोधल्या आणि थरुर यांचं ट्विट रीट्विट करत खास अंदाजात उत्तर दिलं. यानंतर शशी थरुर यांनी ट्विट करत रामदास आठवलेंना उत्तर दिलं. थरुर यांनी ट्विट करताना थेट जेएनयूच्या (JNU) नव्या कुलगुरू डॉ. शांतीश्री धुलिपुडी पंडीत यांच्यावर निशाणा साधला.
शशी थरुर यांचं पहिलं ट्विट
शशी थरुर यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचा फोटा होता. त्यात रामदास आठवले मागे बसलेले दिसून येतात. थरुर म्हणाले की, बजेटवरील चर्चा दोन तास चालली. रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सर्व काही सांगत आहेत. याशिवाय पहिल्या रांगेत बसलेल्या लोकांना देखील अर्थमंत्री करत असलेल्या दाव्यावर विश्वास होत नाही, असं थरुर यांनी म्हटलं होतं.
रामदास आठवलेंनी चूक पकडली
थरुर यांच्या टीकेला रामदास आठवले यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. डिअर शशी थरुरजी, विनाकारण वक्तव्य करताना चुका होता. Bydet नसतं तर Budget असतं आणि rely नसून replay असतं आम्ही समजू शकतो, असं रामदास आठवले म्हणाले. खरंतर शशी थरुर हे नव्या आणि मोठ्या इंग्रजी शब्दांचा वापर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का देतात. मात्र, आठवले यांनी ट्विटवर त्यांना इंग्रजीचे धडे दिले.
I stand corrected, Ramdas ji. Careless typing is a bigger sin than bad English! But while you’re on a roll, there’s someone at JNU who could benefit from your tuition…..
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 10, 2022
शशी थरुर यांच्याकडून प्रकरणाला जेएनयूचा अँगल
रामदास आठवले यांनी चुका पकडल्यानंतर शशी थरुर यांनी ती मान्य केली. थरुर यांनी टायपिंग मिस्टेक असल्याचं म्हटलं. निष्काळजीपणे टायपिंग करणं हे खराब इंग्रजीपेक्षा मोठं पाप आहे. मात्र, तुम्ही शिकवत आहात तर जेएनयूमध्ये कोणीतरी आहे त्यांना तुमच्या शिकवण्याचा फायदा होईल, असं शशी थरुर म्हणाले. शशी थरुर यांचा इशारा हा जेएनयूच्या नव्या कुलगुरु शांतीश्री धुलिपुडी यांच्याकडे होता. पंडित यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात व्याकरणाच्या चुका होत्या ज्यामुळं त्या ट्रोल झाल्या होत्या.
इतर बातम्या:
Ramdas Athawale catch spelling mistake of Shashi Tharoor Congress MP accepted mistake and said your guidance needed in JNU