हजारो कोटींची उलाढाल, पुढच्या 5 वर्षांसाठी पतंजलीची 5 मोठी उद्दिष्ट्ये
योग गुरु रामदेव बाबा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पतंजलीचं पुढचं ध्येय काय असणार त्यावर भाष्य केलंय.
नवी दिल्ली : योग गुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पतंजलीचं (Patanjali) पुढचं ध्येय काय असणार त्यावर भाष्य केलंय. येत्या पाच वर्षात पतंजलीचे पाच नवे उद्देश असणार आहेत. पतंजली येत्या पाच वर्षात नवे चार आयपीओ आणून पाच नव्या कंपन्या स्थापन करणार आहे. पतंजलीमार्फत वेगवेगळ्या योजनांमधून पाच लाख लोकांसाठी रोजगार उपलब्ध जाणार असल्याचं रामदेव बाबा यांनी सांगितलं आहे. शिवाय सध्या पतंजलीची वार्षिक उलाढाल ही 40 हजार कोटी आहे येत्या पाच वर्षात ती एक लाख कोटी करण्याचा आमचं लक्ष्य आहे, असंही ते म्हणाले.