Video : राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले?
लोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले.
नवी दिल्लीः लोकसभा असो की विधानसभा. अनेक गमती-जमती होताना आपण पाहतो. तसाच एक धमाल किस्सा घडला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केरळच्या खासदाराला (MP) चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापती महोदयांनी ही चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर राणेंचा चेहरा पाहण्यासारखा झाला. दरम्यान, यापू्र्वीही केंद्रीय मंत्री (Union Minister) नारायण राणे यांचा लोकसभेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ‘डीएमके’च्या नेत्या कनिमोझी यांनी नारायण राणे यांना त्यांच्या खात्याबद्दल इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे नारायण राणे यांना नीट उत्तर देता आले नव्हते. कोरोनामुळे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सरकारच्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, केंद्र सरकार पावलं उचलणार का ? , असा प्रश्न खासदार कनिमोझींनी नारायण राणेंना विचारला होता. कनिमोझी यांनी विचारलेला प्रश्न आपण नीट ऐकला आणि समजलाही. मात्र, लोकसभा अध्यक्षांना असे वाटले की मला प्रश्न समजला नाही, म्हणून त्यांनी पुन्हा हिंदीत प्रश्न सांगितला, असे नारायण राणे म्हणाले होते. त्यानंतर राणेंमुळे लोकसभेत महाराष्ट्राची मान खाली गेली, अशी टीका शिवसेनेने केली होती.
नेमके प्रकरण काय?
केरळचे खासदार सुरेश कोडीकुन्नील यांनी एक प्रश्न विचारला. तसेच कोरोनाकाळात उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. या काळात सरकारने काय मदत केली. याचे सविस्तर उत्तर देण्याचे आवाहन केले. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, माननीय अध्यक्ष महोदय. कोरोनाच्या महामारीचा गेल्या दोन वर्षांत उद्योग क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले. काही सुरूही झाले. मात्र, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत 2 लाख 80 हजार कोटी रुपये कोरोनाचा फटका बसलेल्या उद्योगांसाठी खर्च केले गेले, असे त्यांनी सांगितले.
सभापतींनी लक्षात आणून दिली चूक
राणे पुढे म्हणाले की, नुकसान झालेल्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यातून आम्हाला तामिळनाडूमध्येही अनेक उद्योगकांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांना कर्ज दिले. सबसिडी दिली. त्यामुळे तामिळनाडूमध्ये जितके उद्योग होते ते पुन्हा एकदा सुरू झाले. मात्र, या उत्तरावर सभापती महोदयांनी हरकत घेतली. सुरेश कोडीकुन्नील हे केरळचे आहेत, असे सांगितले. त्यानंतर राणे ओशाळले. तिथेही त्यांनी गडबड केली. तर तुम्ही तामिळनाडू समजून घ्या, असा उल्लेख केला. त्यानंतर सभापतींनी केरळ म्हणत त्यात पुन्हा सुधारणा केली आणि पुढला प्रश्न पटलावर घेतला.
इतर बातम्याः
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?