क्वारंटाईन म्हणजे जेल नाही, ‘मन की बात’मध्ये कोरोनावर मात करणारे रामगप्पा याचं नागरिकांना आवाहन

क्वारंटाईन म्हणजे जेल नाही, असं कोरोनावर मात केलेले रामगप्पा तेजा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' (Corona fighter share experience in Man ki baat) कार्यक्रमात म्हणाले.

क्वारंटाईन म्हणजे जेल नाही, 'मन की बात'मध्ये कोरोनावर मात करणारे रामगप्पा याचं नागरिकांना आवाहन
Follow us
| Updated on: Mar 29, 2020 | 1:49 PM

नवी दिल्ली :क्वारंटाईन म्हणजे लोकांना जेल वाटतं. मात्र तसं नाही. ते आपल्यासाठीच आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचं पालन करायला हवं”, असं कोरोनावर मात केलेले रामगप्पा तेजा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ (Corona fighter share experience in Man ki baat) कार्यक्रमात म्हणाले. रामगप्पा तेजा यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’मधून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रामगप्पा तेजा यांना ‘मन की बात’मार्फत आपला अनुभव लोकांसमोर मांडण्याचं आवाहन केलं (Corona fighter share experience in Man ki baat).

रामगम्पा तेजा नेमकं काय म्हणाले?

“मी आयटी सेक्टरमध्ये काम करतो. कामानमित्त मी दुबईत गेलो होतो. तिथे मला कोरोनाची लागण झाली. मात्र, तेव्हा ते जाणवलं नाही. इथे आल्यावर मला कोरोनाचे लक्षणं जाणवू लागले. मला प्रचंड ताप येत होता. अखेर पाच-सहा दिवसांनी डॉक्टरांनी माझी रक्त तपासणी केली. त्यात मी कोरोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं. मला हैदराबादच्या गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथे 14 दिवस उपचार केल्यानंतर मी बरा झालो आणि मला डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळताच मी खूप घाबरलो. मला तर विश्वासच बसत नव्हता की अशाप्रकारच्या आजाराची मला लागण होईल. भारतात तेव्हा जास्त प्रमाणात कोरोना पसरला नव्हता. मला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टर आणि नर्सेस खूप चांगले काम करत होते. ते दररोज माझ्याशी बोलत. मी लवकर बरा होणार, असा मला धीर देत होते. त्यांच्या आधारामुळेच मी बरा झालो.

माझ्यामुळे घरातील इतर लोकांना कोरोनाची लागण झाली नाही. ही माझ्यासाठी एक दिलासादायक गोष्ट आहे. मी 14 दिवस घरात एका रुममध्ये राहिलो. मी कुणाशीही संपर्क केला नाही. खरं म्हणजे होम क्वारंटाईन म्हणजे लोकांना जेल वाटतं. मात्र तसं नाही. ते आपल्यासाठीच आहे. सरकारने दिलेल्या सुचनांचं पालन करायला हवं”, असं रामगप्पा यांनी सांगितलं.

दरम्यान, कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देभरात लॉकडाऊनची घोषणा केली. मात्र, या लॉकडाऊनमुळे देशातील गरिब, होतकरु नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं समोर येत आहे. याच पार्श्वभूीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांची ‘मन की बात’मध्ये माफी मागितली. मात्र, कोरोनाविरोधात लढण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

“सर्वात अगोदर मी देशाच्या सर्व नागरकांची माफी मागतो. नागरिक मला माफ करतील, असा मला विश्वास आहे. काही कठोर निर्णय घेतल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. विशेष करुन माझ्या गरिब नागरिकांना जास्त त्रास होत असेल. त्यांना असं वाटत असेल की, असा कसा पंतप्रधान आहे ज्याने आम्हाला संकटात टाकलं, मी त्यांची खरच माफी मागतो. भरपूर लोक माझ्यावर नाराज असतील”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“तुमच्या अडचणी मी समजू शकतो. मात्र, भारतात 130 कोटी लोकसंख्या आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी हे पाऊल उचलण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. कोरोनाविरोधात ही लढाई जीवन आणि मृत्यू दरम्यानची लढाई आहे. ही लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळेच हा कठोर निर्णय घ्यावा लागला. आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे”, अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली.

“कोरोनाविरोधात लढण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. कोरोनाविरोधात लढणारे हे खरे सैनिक आहेत. मी या सैनकांशी गेल्या काही दिवसात फोनवर चर्चा केली. मला त्यांच्याशी बोलून खूप प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा मी मन की बातच्या माध्यमातून आपल्या सर्वांना घ्यायची आहे. त्यामुळे आज ते त्यांचा अनुभव ‘मन की बात’मध्ये मांडणार आहेत”, असं मोदींनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

गरीब म्हणतात असा कसा पंतप्रधान, मला क्षमा करा…, ‘मन की बात’मध्ये मोदींचा माफीनामा

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी, 40 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

पिंपरीत पाच, अहमदनगरमध्ये एका ‘कोरोना फायटर’ला डिस्चार्ज, नर्स-डॉक्टरांकडून टाळ्यांच्या कडकडाटात निरोप

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.