2000 ची नोट बदलण्यासाठी फॉर्म लागणार का? ओळखपत्र लागणार का? SBI कडून महत्वाचे अपडेट

SBI News on 2000 Note : दोन हजारांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरु होणार आहे. परंतु अर्ज भरावा लागणार आहे का? ओळखपत्र लागणार आहे का? किती नोटा बदलता येणार? यासंदर्भात भारतीय स्टेट बँकेने परिपत्रक काढले आहे.

2000 ची नोट बदलण्यासाठी फॉर्म लागणार का? ओळखपत्र लागणार का? SBI कडून महत्वाचे अपडेट
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 4:24 PM

नवी दिल्ली : दोन हजाराच्या नोटबंदीचा निर्णय जाहीर झाला. रिझर्व्ह बँक आता 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजाराच्या नोटा चलनातून परत घेणार आहे. या नोटा बँकांमध्ये जमा करता येणार आहे. या नोटा जमा करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल, ओळखपत्र द्यावे लागेल, अशी बातमी आली होती. परंतु भारतीय स्टेट बँकेने कोणतेही ओळखपत्र देण्याची किंवा फॉर्म भरण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच एका वेळेस किती नोटा बदलता येणार आहे, हे ही सांगितले आहे. येत्या २३ मे पासून नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

काय म्हटले एसबीआयने

स्टेट बँकेने रविवारी नोटा बदलण्यासंदर्भात एक गाइडलाइन जारी केली. त्यात नोट बदलण्यासाठी कोणताही फॉर्म भरण्याची किंवा ओळखपत्र देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच एका वेळेस फक्त दहा नोटाच बदलता येणार आहे. कोणत्याही बँकेत जाऊन या नोटा बदलता येणार आहे. त्यासाठी बँकेत खाते असण्याची गरज नाही. जर तुमचे त्या बँकेत खाते असेल तर त्यामध्येही ही रक्कम जमा करु शकतात. नोटा बदलण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

हे सुद्धा वाचा

SBI

1 2,000 रुपयांच्या नोटा बदलून देण्यावर मर्यादा आहे का?

एका वेळी 20 bहजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत, 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.

2 बिझनेस करस्पॉन्डंटच्या (बीसी) माध्यमातून 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील का?

होय, खातेदाराला दररोज 4,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत बीसीद्वारे 2,000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण केली जाऊ शकते.

3 कोणत्या तारखेपासून नोटा बदलात येतील?

23 मे 2023 पासून सर्व बँकांच्या शाखामध्ये नोटा बदलता येणार आहे.

4 नोटा बदलून घेण्यासाठी बँकेचा ग्राहक असणे आवश्यक आहे का?

नाही, कोणत्याही बँकेच्या शाखेत एका वेळी 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलू शकतात.

5 एक्सचेंज सुविधेसाठी काही शुल्क भरावे लागेल का?

नाही, एक्सचेंजची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाईल.

6 कधीपर्यंत नोटा बदला येणार

30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलता येणार आहे.

7 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा नाही बदलल्या तर काय

आरबीआयने 30 सप्टेंबर 2023 पर्यंत दोन हजारच्या नोटा चलनात कायम राहणार असल्याचे म्हटले आहे. तोपर्यंत या नोटा बदलून घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा

दोन हजाराची नोट बंदी अन् सोन्याची खरेदी वाढली, काय आहे समीकरण?

दोन हजाराच्या नोटबंदीचा परिणाम, साप्ताहिक सुट्टी रद्द, कामांचे तास 9 वरुन 11

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.