Prayagraj Stampede: मौनी अमावस्याच्या अमृत स्नानापूर्वी महाकुंभात चेंगराचेंगरी होण्याचे कारण कारण?
Mauni Amavasya: महाकुंभात पाच कोटी भाविक दाखल झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. चालण्यासही भाविकांना अडचण येत आहेत. अचानक संगम नोजवर बॅरिकेड तुटला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली.

Mauni Amavasya: प्रयागराजमध्ये सुरु असलेला महाकुंभ 144 वर्षांनी आला. या महाकुंभात बुधवारी मौनी अमावस्याच्या दिवशी अमृत स्नान होणार होते. त्यापूर्वी रात्री दीड वाजता मोठी दुर्घटना घडली. रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत 20 भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानंतर सकाळी परिस्थिती नियंत्रणात आली आहे. साधू, मंहत आणि भाविक गंगा स्नान करत आहे. भाविकांना काही अडचण होऊ नये म्हणून अखाड्यांनी त्यांच्या स्नानावर स्वत:हून बंदी आणली आहे. परंतु ही चेंगराचेंगरी नेमकी झाली कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाकुंभासाठी मोठी गर्दी
महाकुंभात पाच कोटी भाविक दाखल झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. चालण्यासही भाविकांना अडचण येत आहेत. अचानक संगम नोजवर बॅरिकेड तुटला. त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. मात्र दुसरे कारण असेही सांगितले जात आहे की, महाकुंभमेळा परिसरात एवढी गर्दी होती की काही महिलांचा श्वास गुदमरायला लागला. यानंतर ते एकमेकांवर पडल्या. त्यामुळे काही वेळातच बॅरिकेडिंग तुटून चेंगराचेंगरी झाली.
स्नानाच्या जागी आता रुग्णवाहिकांची रांग
चेंगराचेंगरीनंतर आखाड्याच्या स्नानासाठी मोकळ्या करण्यात आलेल्या ठिकाणी रुग्णवाहिकांची रांग दिसून आली. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. यामुळे इतर सुरु असलेल्या रस्त्यांवर जास्त गर्दी झाली आहे. यामुळेच गुदमरल्याने अनेक जण खाली पडून चेंगराचेंगरी सापडले आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले, चेंगराचेंगरीच्या दुघटनेने आम्ही दु:खी आहोत. हजारो भाविक आमच्यासोबत होते. जनहितार्थ आम्ही आज स्नानात भाग घेणार नाहीत. मी लोकांना आवाहन करतो की आजच्या ऐवजी वसंत पंचमीला स्नानासाठी यावे. भाविकांना संगम घाटावर येण्याऐवजी पवित्र गंगा नदीत स्नान करावे. चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचा दोष प्रशासनाचा नाही, करोडो लोकांना सांभाळणे सोपे नाही. अधिकाऱ्यांना सहकार्य करावे.
दरम्यान, महाकुंभमेळ्यातील परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि तातडीने मदत उपाययोजनांवर भर दिला.