AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा गुप्ता ठरणार देशातील १८ व्या महिला मुख्यमंत्री, याआधी कोणाला हा बहुमान?

भाजपच्या नेत्या रेखा गुप्ता यांचे नाव अखेर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवडले गेले आहे. त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होत्या. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपाने धक्कातंत्राचा वापर करीत कोणाला फारसा माहिती नसलेला चेहरा मुख्यमंत्री पदासाठी निवडला आहे. देशात याआधी महिला मुख्यमंत्री पदाचा मान कोणाला मिळाला ?

रेखा गुप्ता ठरणार देशातील १८ व्या महिला मुख्यमंत्री, याआधी कोणाला हा बहुमान?
Rekha Gupta will become the 18th woman Chief Minister of the country
| Updated on: Feb 19, 2025 | 11:06 PM
Share

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा मान आता रेखा गुप्ता यांना मिळाला आहे. पन्नाशीला पोहचलेल्या रेखा गुप्ता या उद्या दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा रामलीला मैदान येथे दुपारी होणार आहे. त्या देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत. या आधी कोणाला हा मान मिळाला हे पाहणे महत्वाचे आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून  इंदिरा गांधी आपल्या देशाला लाभल्या आहेत. भारताच्या सर्वोच्च पदावर निवडून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील विराजमान झाल्या होत्या. आताही दौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहेत. मात्र, महाराष्ट्राला अजूनही महिला मुख्यमंत्री मिळालेला नाही. परंतू देशातील अनेक राज्यात महिलांच्या हाती राज्याची सूत्रे गेली असून त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली आहेत.

दिल्लीतच आप पार्टीच्या अतिशी यांना मु्ख्यमंत्री म्हणून सन्मान मिळाला होता. त्याआधी काँग्रेसच्या शीला दीक्षित यांनी तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषविले आहे. आपच्या अतिशी यांना सर्वात कमी काळ दिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषवायला मिळाले त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या सुषमा स्वराज या १९९८ मध्ये ५२ दिवस राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. आता रेखा गुप्ता या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनणार असून त्या देशाच्या १८ व्या महिला मुख्यमंत्री ठरणार आहेत.

कोणाचा कारकीर्द किती

या आधी देशात तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून १३ वर्षे १२० दिवस ( २०११ पासून पदावर कायम ) काम करीत आहेत. तर राजस्थानच्या मुखमंत्री म्हणून भाजपाच्या वसुंधरा राजे ( २००३-०८,२०१३-१८, ) असे दहा वर्षे राहिल्या आहेत. बसपाच्या मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून ७ वर्षे ५ दिवस (१९९५,१९९७,२००२-०३,२००७-१२ ) राहिल्या आहेत. तर दक्षिणेतील राज्य तामिळनाडूच्या जय ललिता या १४ वर्षे १२४ दिवस( १९९१-९६,२००२-०६,२०११-१४,२०१५-१६ ) मुख्यमंत्री राहिल्या आहेत. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ शीला दीक्षित राहिल्या असून त्या १५ वर्षे (१९९८-२०१३ ) राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.