Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले…

पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले जात असून त्यांची हेरगिरी केली जात आहे, असा दावा करत विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. (Ashwini Vaishnaw)

Parliament Monsoon Session: ज्या पेगाससवर संसदेत रान उठलं, त्यावर केंद्र सरकारचा लोकसभेतच खुलासा; अश्विनी वैष्णव म्हणाले...
Ashwini Vaishnaw
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 4:42 PM

नवी दिल्ली: पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप केले जात असून त्यांची हेरगिरी केली जात आहे, असा दावा करत विरोधकांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारला धारेवर धरले. मात्र केंद्र सरकारने विरोधकांचा हा दावा सपशेल फेटाळून लावला आहे. या वृत्तात काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. (Reports are false and baseless said IT Minister Ashwini Vaishnav in Lok Sabha)

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज संसदेत या प्रश्नावर सरकारची भूमिका मांडली. डेटामध्ये फोन नंबर्स असल्याने त्यामुळे हॅक झाल्याचं स्पष्ट होत नाही, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. डेटामुळे सर्व्हिलान्स झालं हे स्पष्ट होत नाही. एनएसओनेही रिपोर्ट चुकीची आणि तथ्यहीन असल्याचं म्हटलं आहे, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यावेळी सर्व्हिलान्स प्रोटोकॉल्सची सखोल माहिती देतानाच कोणत्याही प्रकारे अवैध सर्व्हिलान्स करणं आपल्या सिस्टिममध्ये शक्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेरगिरी शक्य नाही

या फोन नंबरशी संबंधित लोकांची हेरगिरी केली जात आहे, असा आरोप आहे. मात्र, रिपोर्टनुसार, डेटातील एका फोन नंबरमुळे डिव्हाईस पेगासस इन्फेक्टेड होते किंवा हॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सिद्ध होत नाही, असं वैष्णव यांनी सांगितलं. आपल्या कायद्यात आणि मजबूत संस्थांमध्ये चौकशी आणि संतुलनासह कोणत्याही प्रकारची हेरगिरी शक्य नाही. भारतात त्याबाबतची चांगली प्रक्रिया आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षाच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक संचाराचं वैध हस्तक्षेप केला जातो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पेगासस सॉफ्टवेअर कसं काम करतं?

ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे, त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो. पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं.

व्हॉटस अपमध्ये कसं इन्स्टॉल होतं?

2019 ला हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन फोनध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होतं, त्यावेळेस एक वेगळीच पद्धत अवलंबली होती. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक उणीव(BUG) शोधून काढली आणि त्याचाच फायदा घेत हॅकर्सनी नकली व्हाटस अप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. त्याच दरम्यान एका कोडद्वारे पेगाससला फोनमध्ये इन्स्टॉल केलं. (Reports are false and baseless said IT Minister Ashwini Vaishnav in Lok Sabha)

संबंधित बातम्या:

ज्या पेगाससवर संसदेत रान उठलंय, ते नेमकं आहे काय, नेमकी हेरगिरी कशी केली जाते? वाचा सविस्तर

300 भारतीयांची सरकारकडूनच हेरगिरी, 40 पत्रकारांचा समावेश, केंद्र सरकार म्हणतं आरोप निराधार, वाचा सविस्तर काय घडतंय?

Parliament Monsoon Session: तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे; Pegasus हॅकिंगवरून राहुल गांधींचा टोला

(Reports are false and baseless said IT Minister Ashwini Vaishnav in Lok Sabha)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.