Republic Day 2021 : वयाच्या चौथ्या वर्षी परेडमध्ये सहभागी झालेला ‘रियो’ 18व्या वेळा ‘कदमताल’ करणार!

वयाच्या चौथ्या वर्षी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झालेला 'रियो' सलग 18 व्या वेळी राजपथावर दिसणार आहे. हा रियो म्हणजे 61 घोडेस्वार रेजिमेंटचा एक हिस्सा आहे.

Republic Day 2021 : वयाच्या चौथ्या वर्षी परेडमध्ये सहभागी झालेला 'रियो' 18व्या वेळा 'कदमताल' करणार!
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 3:50 PM

नवी दिल्ली : 72व्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर एक खास चित्र पाहायला मिळणार आहे. वयाच्या चौथ्या वर्षी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झालेला ‘रियो’ सलग 18 व्या वेळी राजपथावर दिसणार आहे. हा रियो म्हणजे 61 घोडेस्वार रेजिमेंटचा एक हिस्सा आहे. भारतातच जन्म झालेला हनोवेरियन जातीचा घोडा असलेल्या रियोचं वर्य 22 वर्षे आहे. तो वयाच्या चौथ्या वर्षी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाला होता. यावर्षी तिसऱ्यांना हा रियो 61 घोडेस्वार रेजिमेंटचं नेतृत्व करणार आहे.(‘Rio’ will participate in the parade for the 18th time)

दीपांश्यू श्योराण यांनी दिलेल्या माहितीनुसार रियो हा अत्यंत खास घोडा आहे. तो कमांडरचे आदेश पाळतो. ‘रियो’ यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 18व्या वेळेस राजपथावरील परेडमध्ये सहभागी होत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचं श्योराण म्हणाले. 61 घोडेस्वार रेजिमेंटची स्थापना जयपूरमध्ये 1953 मध्ये झाली होती. त्यानंतर प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या परेडचं आकर्षण ही रेजिमेंट राहिली आहे. म्हैसूर लान्सर्स, जोधपूर लान्सर्स, आणि ग्वाल्हेर लान्सर्स सह 6 भूतपूर्व शाही सेनांची मिळून या रेजिमेंटची स्थापना झाली आहे. 1918 मध्ये या रेजिमेंटच्या पूर्वाश्रमीच्या जवानांनी ब्रिटिश सशस्त्र बलांसह इज्राइलमध्ये हैफाची महत्वपूर्ण लढाई लढली होती.

राजपथावर यंदा भक्ती-शक्तीचा जागर

प्रजासत्ताक दिनी यंदा राजपथावर अवघ्या जगाला भारताच्या लष्करी सामर्थ्यासह महाराष्ट्राची संत परंपरा पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या भेटीच्या फिरत्या देखाव्याचा समावेश यंदाच्या चित्ररथात असणार आहे. त्याचबरोबर तुकारामांची गाथा आणि संत साहित्याची महती या देखाव्याद्वारे सांगितली जाणार आहे. काही वारकरीही या चित्ररथावर पाहायला मिळतील. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा मंगळवारी राजपथावर पाहायला मिळणार आहे.

कसा असेल यंदाचा चित्ररथ?

यंदा राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा फिरता देखावा साकारला जाणार आहे. या चित्ररथात तुकारामांची गाथा, संत साहित्याची महती पाहायला मिळणार आहे. अनेक वारकरीही या चित्ररथावर दिसणार आहेत. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत गोरोबा काका, संत जनाबाई यांचा देखावा यंदाच्या चित्ररथावर साकारला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Republic Day : ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरु नका!, शेतकऱ्यांच्या परेडपूर्वी उत्तर प्रदेश सरकारचा आदेश

‘अटी आमच्या, ट्रॅक्टर रॅली तुमची’, शेतकरी-दिल्ली पोलीस यांच्यात तोडगा कसा निघाला? वाचा Inside Story

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.