AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Republic Day 2025 : आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन, देशभरात उत्साहाचे वातावरण

आज कर्तव्य पथावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे.

India Republic Day 2025 : आज भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन, देशभरात उत्साहाचे वातावरण
republic day
| Updated on: Jan 26, 2025 | 8:52 AM
Share

India Republic Day 2025 : आज 26 जानेवारी… दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाही मोठ्या उत्साहात राज्यासह देशभरात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कर्तव्य पथावर लष्करी संचलन पार पडणार आहे. आज कर्तव्य पथावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देश सज्ज झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रध्वज फडकवून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सुरुवात करणार आहेत.

भारतीय संविधानाची ७५ वर्षे हा भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या संचलनाचा केंद्रबिंदू असणार आहे. या संचलनात ‘सुवर्ण भारत – वारसा आणि विकास’ या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर केले जाणार आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे १६ चित्ररथ असतील. तर केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि संघटनांकडून 15 चित्ररथ सादर केले जातील. या चित्ररथांमध्ये तिन्ही सैन्यदलांशी संबंधित देखावा असणार आहे. यासोबतच स्वदेशी अर्जुन युद्ध रणगाडा, तेजस लढाऊ विमान आणि प्रगत हलक्या हेलिकॉप्टरचा समावेश असणार आहे.

आज सकाळी ९.३० वाजता प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरु होणार आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे यंदाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यानंतर १० वाजेपर्यंत तिन्ही लष्कराचे प्रमुख आणि सरंक्षण मंत्री नॅशनल वॉर मेमोरिअलमध्ये येणार आहेत.

महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्य पथावर नाही

भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर ‘मजबूत आणि सुरक्षित भारत’ या संकल्पनेवर आधारित लष्कराचे देखावे सादर केले जातील. त्यासोबतच सी-१३० जे सुपर हर्क्युलिस, सी-२९५, सी-१७ ग्लोबमास्टर, पी-८ आय, मिग-२९ आणि एसयू-३० यासह इतर विमानांचाही समावेश असणार आहे. यंदा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, बिहार, झारखंड, गुजरात, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि दिल्लीचे चित्ररथ पाहायला मिळणार आहे. मात्र महाराष्ट्राचा चित्ररथ कर्तव्य पथावर नसेल, अशी माहिती समोर आली आहे.

लष्करी शौर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा

यंदा होणाऱ्या लष्करी संचलनामध्ये लष्करी शौर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. भारताचा ‘वारसा’ आणि ‘विकास’ यांचे प्रतिकात्मक दर्शनही घडवले जाईल. ‘ब्रह्मोस’, ‘पिनाक’ आणि ‘आकाश’ यासारख्या काही अत्याधुनिक संरक्षण साधनांद्वारे आपल्या लष्करी सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली जाईल. तसेच लष्कराची युद्ध पाळत यंत्रणा ‘संजय’ तर डीआरडीओची जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी ‘प्रलय’ यासारखी क्षेपणास्त्रेही यात असतील.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.