Farmers Protest | शेतकऱ्यांसाठी 30 खेळाडू मैदानात, राष्ट्रपतींकडे पुरस्कार परत करणार!
हे खेळाडू आज हा पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहे. यामध्ये बॉक्सर विजेंद्र सिंह याचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन (Delhi Farmer Protest) देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे (Return The Award Campaign) आले आहेत. त्यांनी पुरस्कार वापसी मोहीम हाती घेतली आहे. हे खेळाडू आज हा पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहे. यामध्ये बॉक्सर विजेंद्र सिंह (Boxer Vijender Singh) याचाही समावेश आहे (Return The Award Campaign).
केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी बांधव तसंच शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. (Delhi Farmer Protest) हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. याला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. शेतकरी आंदोलनाचा आजचा 12 दिवस आहे.
30 खेळाडू पुरस्कार परत करणार
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित जवळपास 30 खेळाडू आज हा पुरस्कार परत करण्यासाठी राष्ट्रपतींकडे जाणार आहेत. हे खेळाडू दुपारी अडीच वाजता प्रेस क्लब गाठून राष्ट्रपती भवनाच्या दिशेने रवाना होतील.
या 30 खेलाडूंमध्ये गुरमैल सिंह, हरमिंदर सिंह, वेटलिफ्टिंग कोच पाल सिंह, करतार सिंह यांचा समावश आहे. हे खेळाडू त्यांना मिळालेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करणार आहेत.
If the government doesn’t withdraw the black laws, I’ll return my Rajiv Gandhi Khel Ratna Award – the highest sporting honour of the nation: Boxer Vijender Singh #FarmLaws https://t.co/8Q5fVEmncC pic.twitter.com/imTATDZCei
— ANI (@ANI) December 6, 2020
प्रकाशसिंह बादल यांच्याकडून पद्म विभूषण पुरस्कार परत
यापूर्वी केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंह बादल यांनी केंद्राचा पद्म विभूषण पुरस्कार परत केला. तर अकाली दलाचे नेते सुखदेव सिंह ढिंढसा यांनी आपला पद्म भूषण पुरस्कार परत करणार असल्याचं सांगितलं (Return The Award Campaign).
खेळाडूंची पुरस्कार वापसी मोहीम
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. त्यांनी अॅवॉर्ड वापसी मोहीम हाती घेतली आहे. भारताचे माजी बास्केटबॉल खेळाडू आणि अर्जुन पुरस्कार विजेते सज्जच सिंह चिमा हे काही दिवसांपासून अर्जुन आणि पद्म पुरस्कार विजेत्या पंजाबमधील खेळाडूंशी पुरस्कार वापसी मोहीमेसाठी संपर्क करत आहेत.
‘शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. ज्या मातीतून शेतकरी पिक घेतो त्याच मातीतून खेळाडू जन्माला येतो. त्यामुळे आम्ही खेळाडू शेतकरी आंदोलनापासून दूर कसे राहू’, असं सज्जन सिंह चिमा म्हणाले. गेल्या चार दिवसांपूर्वी जालंधरमध्ये पार पडलेल्या बैठकीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी झाले होते. कृषी कायद्यामुळे फक्त शेतकऱ्यांचंच नाही, तर संपूर्ण देशवासियांचं नुकसान होणार असल्याचं मत या खेळाडूंनी व्यक्त केलं.
जालंधरमध्ये खेळाडूंची महत्वपूर्ण बैठक
चिमा यांच्या पुरस्कार वापसी मोहीमेला अनेक पुरस्कार प्राप्त 30 खेळाडूंची साथ मिळाली आहे. त्यात गुरमेल सिंह, सुरिंदर सिंग सोढी यांसारख्या मोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. हे दोन्ही खेळाडू 1980 ला मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघाचं प्रतिनिधित्व करत होते. या संघानं त्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.
कोण आहेत सज्जन सिंह चिमा?
सज्जन सिंह चिमा हे भारतीय बास्केटबॉल संघाचे खेळाडू राहिले आहेत. 1982मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये त्यांनी भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तसंच ते पंजाब पोलीस दलातून पोलीस अधीक्षक पदावरुन निवृत्त झाले आहेत.
चिमा यांना मागील महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. सध्या त्यांची प्रकृती बरी नसून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आपण नुकतेच ICU मधून बाहेर आलो आहोत आणि लवकरच बरा होऊन खेळाडूंच्या अवॉर्ड वापसी मोहीमेत सहभागी होईल, असं चिमा माध्यमांशी बोलताना म्हणाले.
जर शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घेतले नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करणार : बॉक्सर विजेंद्र सिंहhttps://t.co/12uLc7o01w#VijenderSingh #DelhiFarmersProtest
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2020
Return The Award Campaign
संबंधित बातम्या :
कृषी कायद्यातील सर्वाधिक वादग्रस्त क्लॉज कोणता?; पी. साईनाथ म्हणतात…
पंजाबमधील खेळाडूंचा शेतकरी आंदोलनाला भक्कम पाठिंबा, कृषी कायद्याविरुद्ध ‘अवॉर्ड वापसी’ मोहीम!