Karnataka : ज्ञानवापीनंतर आता जामा मशीदीवर ही दावा, राइट विंग ग्रुप म्हणाले-एकेकाळी होते मंदिर

तसेच उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, अंजनेय मंदिरावर जामिया मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा देखील केला आहे. तर ही मशीद अंजनेय मंदिर असल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला.

Karnataka : ज्ञानवापीनंतर आता जामा मशीदीवर ही दावा, राइट विंग ग्रुप म्हणाले-एकेकाळी होते मंदिर
कर्नाटकातील जामिया मशिदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 7:34 PM

मंड्या (कर्नाटक) : वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid)वादामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. यामुळे देशात राजकारण चांगलेच गरम झाले असून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली होती. त्यांनी आधी बाबरी घेतली आता ज्ञानवापी ची वेळ आली आहे. मुस्लिमांची कधी वोट बँक नव्हती आणि ती असणार ही नाही असे म्हटले होते. तर ज्ञानवापी दावावरून देशात धार्मिक द्वेषही पसरवला जात आहे. ज्ञानवापी प्रकरण हे ताजे असतानाच आता एका दुसऱ्या वादाने तोंड फोडले आहे. हे प्रकरण कर्नाटकातील मंड्या येथे बांधलेली जामा मशीद (Jamia Masjid in Karnataka)आहे. तसेच दक्षिणपंथी गटाने आपले लक्ष्य जामा मशीदकडे वळवले आहे. तसेच उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मंड्याच्या उपायुक्तांना निवेदन देऊन कर्नाटकातील जामिया मशिदीत अंजनेयच्या मूर्तीची पूजा (Idolatry of Anjaneya) करण्याची परवानगी मागितली. तसेच असे सांगण्यात येत आहे की उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला की ही रचना मूळ मंदिराची होती. ज्याचे नंतर मशिदीत रूपांतर करण्यात आले. ते आता पुन्हा हिंदूंच्या ताब्यात द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

अंजनेय मंदिरावर जामिया मशीद बांधण्यात आली

तसेच उजव्या विचारसरणीच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, अंजनेय मंदिरावर जामिया मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा देखील केला आहे. तर ही मशीद अंजनेय मंदिर असल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांनी पुढे दावा केला की, पर्शियाच्या शासकाला लिहिलेल्या पत्रात टिपू सुलतानने हे मंदिर पाडून ही मशीद बांधल्याचे सांगितले होते. पुरातत्व विभागाने कागदपत्रांचा विचार करून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच मशिदीच्या आवारात असलेल्या तलावात आंघोळ करण्यास परवानगी देण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे.

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा

दरम्यान उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्या न्यायालयाने सोमवारी जिल्हा प्रशासनाला ज्ञानवापी मशीद संकुलाचा भाग सील करण्याचे निर्देश दिले. जेथे शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे तिथे प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. सरकारी वकील राणा संजीव सिंह यांनी सांगितले की, हिंदू बाजूच्या वतीने दिवाणी न्यायाधीश रविकुमार दिवाकर यांच्या न्यायालयात ज्ञानवापी संकुलात सापडलेले शिवलिंग सुरक्षित करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता, त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने शिवलिंग परिसर सील करण्याचे आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

उल्लेखनीय आहे की याचिकाकर्त्या राखी सिंगचे वकील हरिशंकर जैन यांनी एक अर्ज सादर केला होता ज्यात दावा केला होता की आयोगाला 16 मे रोजी मशिदीच्या आवारात शिवलिंग सापडले होते आणि तो महत्त्वपूर्ण पुरावा आहे. सीआरपीएफ कमांडंटला जागा सील करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती अर्जात करण्यात आली आहे. तसेच वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालण्याचे आदेश द्यावेत. न्यायालयाने हा अर्ज स्वीकारला आहे.

मशिदीतील सीलबंद जागेच्या रक्षणाची जबाबदारी

दिवाणी न्यायाधीश सीनियर डिव्हिजन रवी कुमार दिवाकर यांनी आदेशात म्हटले आहे की, ‘वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले ते तात्काळ सील करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर सील केलेल्या परिसरात कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देऊ नये असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्तालय वाराणसी आणि सीआरपीएफ कमांडंट यांना सील करण्यात येणारी जागा संरक्षित करणे आणि सुरक्षित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.