RRB Recruitment Exam 2020: रेल्वेत मेगाभरती, CBT परीक्षेला आजपासून प्रारंभ; ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
आजची RRB MI ही परीक्षा संगणक आधारित परीक्षा (CBT) आहे. आज दोन सत्रांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. | RRB Recruitment Exam 2020
नवी दिल्ली: रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून (RRB) 1 लाख 40 हजार पदांसाठी राबवण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेला (Job Recruitment) आजपासून लेखी परीक्षेने प्रारंभ झाला. रेल्वे खात्यातील विविध पदांसाठी होणाऱ्या या पदांसाठी तब्बल 2.44 कोटी उमेदवारांचे अर्ज आले होते. आता लेखी परीक्षेनंतर यामधून पुढील टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. (Indian Railways recruting for 1.4 lakh vacancies)
आजपासून या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरु होईल. 15 ते 18 डिसेंबर या कालावधीत स्टेनो, शिक्षक, भाषांतरकाराच्या 1663 पदांसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज (NTPC) पदांसाठी 28 डिसेंबर ते मार्च 2021 या काळात परीक्षा होतील.
तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात पहिल्या श्रेणीतील (CEN No. RRC- 01/2019) पदांसाठीची परीक्षा पार पडेल. या परीक्षेचा कालावधी साधारण एप्रिल 2021 ते जून 2021 असा असेल.
आजची RRB MI ही परीक्षा संगणक आधारित परीक्षा (CBT) आहे. आज दोन सत्रांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून CBT 1 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही सूचना जारी केल्या आहेत.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाकडून परीक्षार्थींना देण्यात आलेल्या सूचना खालीलप्रमाणे:
* परीक्षार्थींना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अनिवार्य. * सर्व उमेदवारांनी तोंडावर मास्क लावणे गरजेचे. केवळ प्रवेशावेळी आणि तपासणीवेळी परीक्षांर्थींच्या चेहऱ्यावरील मास्क हटवले जातील. * परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या शरीराचे तापमान (थर्मल स्कॅनिंग) तपासले जाईल. निर्धारित सीमेपेक्षा तापमान जास्त असल्यास संबंधित उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही. * शरीराचे तापमान जास्त असल्यामुळे परीक्षेला बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळेल. * परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी हँड सॅनिटायझर बाळगणे गरजेचे. * पहिल्या सत्रातील परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या परीक्षेपूर्वी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईझ केले जाईल.
संबंंधित बातम्या:
10 वी पास तरुणांना रेल्वेत सरकारी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय 561 जागा भरणार
नोकरी गेलेल्यांसाठी सरकारकडून Good News, मिळणार 50 टक्के पगार
(Indian Railways recruting for 1.4 lakh vacancies)