देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, RSS चा भाजपला आत्मचिंतनाचा सल्ला

देशाच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच भाजपला आत्मचिंतनाचा सल्ला दिला आहे. देशात फक्त मोदींचा करिश्मा आणि हिदुत्वाचा मुद्दा निवडणुका जिंकण्यासाठी पुरेसा नाही, असं आरएसएसने स्पष्ट म्हटलं आहे.

देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, RSS चा भाजपला आत्मचिंतनाचा सल्ला
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 5:49 PM

नवी दिल्ली : देशात पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला आहे. भाजप पक्षाच्या गोटात अनेक हालचाली घडत आहेत. तर देशभरातील सर्व विरोधक एकाच छतात एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु आहेत. देशातील सर्व विरोधक भाजपच्या विरोधात एकत्र येत आहेत. त्यासाठी विरोधी पक्षांच्या सातत्याने बैठका होत आहेत. तर दुसरीकडे भाजपच्या पदरात नुकतंच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अपयश पडलं आहे. त्यामुळे भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करावी लागणार आहे. या सगळ्या घडामोडी आपापल्या जागेवरुन समांतर घडत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपला आत्मचिंतनाचा मोलाचा सल्ला दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या ‘ऑर्गनायझर’मध्ये भाजपला मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. ऑर्गनायझर’मध्ये छापून आलेल्या लेखात म्हटलं आहे की, भाजपला आगामी निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवण्यासाठी केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्व पुरेसे नहीय. आगामी 2024च्या निवडणुका तसेच इतर निवडणुका जिंकण्यासाठी प्रचंड जनसामान्यांचा पाठिंबा आणि प्रादेशिक नेतृत्वाशिवाय निवडणुका जिंकणं सोपं नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लेखात काय म्हटलंय?

भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत केवळ स्टार प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जोर दिला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडून अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले ज्यांचा संबंध हिदुत्वाशी होता. आपण या मुद्द्यांवर जोर दिला तर निवडणूक जिंकू शकतो, असं भाजपला वाटत होतं. पण सर्वसामान्य नागरिकांनी भाजपला पाठिंबा न देता काँग्रेसला पसंती दिली. त्यामुळे काँग्रेसचा सर्वाधिक जागांवर विजय झाला आणि भाजपला सर्वात मोठा झटका बसला.

हे सुद्धा वाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि हिंदुत्वाचे विचार सर्व ठिकाणी निवडणुका जिंकण्यासाठी पुरेशा नाहीत, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपलं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये म्हटलं आहे. भाजपची विचारधारा आणि केंद्रीय नेतृत्व पक्षासाठी नेहमी सकारात्मक असू शकतात. पण जनतेच्या मनालाही पक्षाने समजून घेतलं पाहिजे. भाजपने कर्नाटकच्या निवडणुकीत केंद्रातील मुद्दे आणण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसने तिथल्या स्थानिक प्रश्नांच्या मुद्द्यांना सोडलं नाही. हेच त्यांच्या विजयाला कारण ठरलं, असं आरएसएसने लेखात म्हटलं आहे.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने भाजपला पहिल्यांदाच निवडणुकीबाबत सल्ला दिला आहे. भाजपच्या रणनीतीवरही संघाने प्रश्न उपस्थित केले. भाजपने जातीच्या मुद्द्यांवरून मतांची जमवाजमव केली. विशेष म्हणजे टेक्नोलॉजीचं हब असलेल्या राज्यात पक्षाने हा प्रयत्न केल्याचं म्हणत संघाने चिंता व्यक्त केली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.