Russia Ukraine War | युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी उच्च स्तरीय प्रयत्न, युक्रेनशेजारील देशात केंद्रीय मंत्र्यांचं पथक जाणार!
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठीची जी बचाव मोहीम सुरु आहे, त्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग हे लवकरच रवाना होत होणार आहेत.
Russia Ukraine War: युक्रेन आणि रशिया (Russia-Ukraine war) दरम्यान सुरु असलेल्या युद्ध संघर्षात अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी भारत सरकारतर्फे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलवली असून लवकरच केंद्रीय मंत्र्यांचं एक पथक युक्रेन शेजारील देशांमध्ये समन्वयासाठी जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठीची जी बचाव मोहीम (evacuation mission) सुरु आहे, त्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी (Hardeepsingh Puri), ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग हे लवकरच रवाना होत होणार आहेत. रशियाकडून सातत्याने युक्रेनवर हल्ले सुरु असून तेथे अडकलेल्या भारतीयांना शक्य तेवढ्या लवकर मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच आपल्या नागरिकांना भारतात आणले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.
Union Ministers Hardeep Singh Puri, Jyotiraditya Scindia, Kiren Rijiju and Gen (Retd) VK Singh to travel to neighbouring countries of Ukraine to coordinate the evacuation mission and help students: Govt sources#RussiaUkraineCrisis pic.twitter.com/DbaQ6U47KQ
— ANI (@ANI) February 28, 2022
पंतप्रधानांनी घेतली उच्चस्तरीय बैठक
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेची मोहीम अधिक वेगवान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. भारतीयांच्या सुटकेसाठी जी बचाव मोहीम सुरु आहे, त्यात समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांचं एक पथक युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल व्ही के सिंग हे युक्रेन शेजारील देशांमध्ये रवाना होतील.
रशिया-युक्रेन युद्ध सद्यस्थिती काय?
रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धाला चार दिवस उलटले आहेत. या संघर्षात आतापर्यंत 4,500 युक्रेनी सैन्य मारले गेले असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्रपती व्लादिमीर जेलेन्स्की यांनी केला आहे. तसेच यात युक्रेनचे 150 रणगाडे, 700 सैनिकी वाहनं, 60 फ्युएल टँक आणि 26 हेलिकॉप्टरही नष्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, हा संघर्ष थांबवण्यासाठी कोणत्याही शर्थीशिवाय बेलारूसच्या सीमेवर भेट घेण्यासाठी दोन्ही देशांचे राष्ट्रपती तयार असल्याची माहिती हाती आली आहे.
इतर बातम्या-