Russia Ukraine War : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात उच्चस्तरीय बैठक, यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुरक्षेला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून नवी दिल्लीकडे धाव घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक उच्चस्तरिय बैठक पार पडली. या बैठकीत यूक्रेनमध्ये अडकेलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली. तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीय.
नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) अधिकाधिक भीषण बनत आहे. मागील चार दिवसात रशियाने यूक्रेनच्या जवळपास सर्व प्रमुख शहरांवर हल्ला चढवलाय. त्यातच आता रशिया यूक्रेनवर अणुबॉम्ब हल्ल्याची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी रशियन न्यूक्लियर डिटरन्स फोर्सला (Nuclear Deterrence Force) अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपला उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून नवी दिल्लीकडे धाव घेतली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक उच्चस्तरिय बैठक पार पडली. या बैठकीत यूक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली. तशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलीय.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक 2 तासांपेक्षा अधिक काळ चालली. यावेळी पंतप्रधान मोदींनी यूक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले. भारतीय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी यूक्रेनच्या शेजारील देशांसोबत चर्चा सुरु आहे’.
#UPDATE| PM Narendra Modi’s high-level meeting on #UkraineRussiaConflict lasted over 2 hours; the PM ensured safety & evacuation of Indian students as the top priority. Further cooperation with neighbouring countries of Ukraine to expedite evacuation will be enhanced: GoI Sources
— ANI (@ANI) February 27, 2022
युक्रेनच्या बॉर्डरवर भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मारहाण होत असल्याचे धक्कादायक व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांकडून हे व्हिडिओ ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीयांची चिंता आणखी वाढली आहे. फक्त स्थानिक नागरिकांना प्रवेश देत पोलंड बॉर्डरवर (Poland Border Video) भारतीयांना बाजुला काढण्यात येत आहे. एवढेच नाही तर त्यांना लाथा, बुक्क्यांनी मारहाणही करण्यात येत आहे. जे भारतीय स्थलांतर करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर सैन्य आणि स्थानिक पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याच्याही घटना समोर आल्या आहे. ही मारहाण विद्यार्थ्यांच्या घरच्यांनाही अस्वस्थ करणारी आहे. प्रशासनाने तातडीने यावर मार्ग काढत विद्यार्थ्यांची सुटका करावी, अशा याचना करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे.
This is the behavior with Indian students at Poland border. They are kicked and told to go back as India didn’t supported Ukraine . Now this is devastating @PMOIndia @DrSJaishankar @narendramodi @MEAIndia @ANI @BBC @aajtak pic.twitter.com/gMeSB0BFfK
— Shivangi shibu (@IndShivangi) February 27, 2022
इतर बातम्या :