Big Breaking : मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा, विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत सर्वात मोठी अपडेट
युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत रशियाने मोठा अलर्टही दिला आहे.
नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनच्या युद्धात (Russia Ukraine war) अनेकांचा बळी जातोय. अनेक भारतीय विद्यार्थी (Indian Students in Ukraine) सध्या युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार धावपळ करत आहे. युक्रेनमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याबाबत पंतप्रधान मोदी (Pm Modi And Putin) आणि पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा झाली आहे. अशी आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. याबाबत रशियाने मोठा अलर्टही दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. मोदींनी युक्रेनमधील परिस्थितीचा आढावा घेतला, विशेषत: खार्किवमध्ये जेथे अनेक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्या भागातून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याबाबत चर्चा केली. अशी माहिती एएन आय या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे भारतीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट
PM Narendra Modi spoke on phone today with Russian President Vladimir Putin. The leaders reviewed the situation in Ukraine, especially in Kharkiv where many Indian students are stuck. They discussed the safe evacuation of the Indian nationals from the conflict areas.
(File pics) pic.twitter.com/IUPgj0Dung
— ANI (@ANI) March 2, 2022
भारतीयांना बाहेर काढण्याचं आव्हान
हजारो भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना यूक्रेनमधून सुखरुपपणे मायदेशी परत आणण्याचं आव्हान भारत सरकारपुढे आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. दरम्यान, यूक्रेनमध्ये अडकलेल्या 20 हजार भारतीयांपैकी आतापर्यंत 6 हजार जणांना मायदेशी परत आणण्यात यश आलंय. तर 17 हजार भारतीय नागरिकांनी यूक्रेनची सीमा सोडली आहे. तशी माहिती MEA चे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलीय.
मोदींची तातडीची बैठक
#WATCH | Prime Minister Narendra Modi chairs a high-level meeting on the Ukraine issue.#RussiaUkraineConflict pic.twitter.com/S1BkCWlrDW
— ANI (@ANI) March 2, 2022
मोठा हल्ला होण्याची शक्यता
रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे.
Kharkiv : रेल्वे, बस, जे मिळेल त्या वाहनानं किंवा पायी खारकीव सोडा, भारतीय दुतावासाचं तातडीचं आवाहन
रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर होईल गंभीर परिणाम, 30% पर्यंतचा निचांक गाठू शकतो शेअर बाजार