रशिया-यूक्रेनवरची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी, यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींकडे मदत मागितली, झेलेन्स्किचं ट्विट
रशिया-युक्रेन युद्धाने सध्या जगाला हादरवून सोडले आहे. अशात युक्रेन एकटा पडल्याचे दिसत होते. आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे.
युक्रेन : रशिया-युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) सध्या जगाला हादरवून सोडले आहे. अशात युक्रेन एकटा पडल्याचे दिसत होते. आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. याबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्किंनी (Zelenskyy) मोदींकडे (Pm Modi)मदतीसाठी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवरून दिली आहे. आतापर्यंत युक्रेनला ठोस मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने युक्रेनची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली होती. रशियाकडून युक्रेवर सतत हल्ले चढवण्यात येत आहेत. या युद्धात अनेक भारतीय नागरिकही अडकले आहे. या युद्धात रणभूमिवर युक्रेनचे अध्यक्ष खुद्द उतरल्याचेही दिसून आले आहे. रशियाकडून सत्त हल्ले होत असल्याने युक्रेन सध्या बेचिराख झाल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थित भारत एखादी ठोस भूमिका घेऊन या दहशतीतून युक्रेनला बाहेर काढेल. अशी अपेक्षा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी मोदींकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे ट्विट
Spoke with ?? Prime Minister @narendramodi. Informed of the course of ?? repulsing ?? aggression. More than 100,000 invaders are on our land. They insidiously fire on residential buildings. Urged ?? to give us political support in?? Security Council. Stop the aggressor together!
— Володимир Зеленський (@ZelenskyyUa) February 26, 2022
यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींकडे मदतीची मागणी
अशा आशयाचे ट्विट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदोमीर झेलेन्स्की यांनी केले आहे. भारताने आतापर्यंत चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता मोदी आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेनंतर समीकरणं बदलणार का, असाही सवाल उपस्थित झाला आहे. या युद्धात युक्रेनचा अनेक भाग रशियाच्या ताब्यात गेला आहे. आता भारत यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बेचिराख युक्रेनला भारत वाचवणार?
या युद्धकाळात युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की हताश असल्याचे दिसत आहे. ते हताशपणे सोशल मीडियाचा वापर करत आपल्या देशातील नागरिकाना बळ देण्याचे काम करत आहेत. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करुन सैनिक आणि देशातील सामान्य नागरिकांना या संकटाला धैर्याने सामोरे जाऊ या म्हणत ते धीर देत आहेत. या युद्धात युक्रेन लढत राहणार आणि तो हारही मानणार नाही असा संदेश ते सोशल मीडियावरुन देत आहेत.
Video : रशियन टँकनं अचानक ट्रॅक बदलला, समोरुन आलेल्या कारला चिरडलं, नेमकं काय घडलं?
NATO कडून युक्रेनचा विश्वासघात: माझा युक्रेन हा एकटा लढतोय; राष्ट्राध्यक्षांचे भावनिक उद्गगार…