Big Breaking झेलेन्स्की युक्रेन सोडून पळाल्याचा रशियन मीडियाचा दावा, दाव्यात किती तथ्य?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी युक्रेन सोडल्याचा दावा रशियाच्या मीडियाने केला आहे. या दाव्यात किती तथ्य आहे? याबाबत स्पष्टता नाही.
Russia Ukraine War : गेल्या नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये (Ukraine Army) घमासान युद्ध सुरू आहे. अशातच रशियन मीडियाने (Russian Media) केलेल्या दाव्याने खळबळ माजली आहे. कारण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी युक्रेन (Ukraine President volodymyr Zelensky) सोडल्याचा दावा रशियाच्या मीडियाने केला आहे. या दाव्यात किती तथ्य आहे? याबाबत स्पष्टता नाही. गेल्या नऊ दिवसांपासून रशियाचे युक्रेनवर सत्त हल्ले सुरू आहेत. आपल्या देशाचे नेतृत्व करताना राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देशातील नागरिकांचे हिरो झाले आहे. अशातच रशियन मीडियाने केलेल्या या दाव्याने युक्रेनियन नागरिक आणि सैन्याच्या मनात संभ्रम निर्माण होऊन परिस्थिती बिघडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की युक्रेन सोडून पोलंडला गेल्याचा दावा ट्विट करून करण्यात आला आहे.
रशियन मीडियाचे ट्विट
#BREAKING | Zelensky left Ukraine for Poland, Russian State Duma speaker says#SputnikBreakinghttps://t.co/49bPDkG7Bg pic.twitter.com/6lzORzssLJ
— Sputnik (@SputnikInt) March 4, 2022
दाव्यात किती तथ्य?
मैदानात बंदूक घेऊन उतरणारे झेलेन्स्की इतके दिवस पाहिल्यानंतर, झेलेन्स्की पळून गेले या दाव्यावर विश्वस ठेवणे अत्यंत कठीण आहे. याबाबत युक्रेनचीही बाजू आल्यानंतरच ठाम बोलता येईल. सध्या रशियन मीडियाचा हा दावा किती खरा हे सांगणे अत्यंत कठीण आहे. त्यामुळे युक्रेनची बाजू समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. याबाबत युक्रेने लवकर स्पष्टता न दिल्यास मोठा संभ्रम निर्माण होण्याचीही शक्यता आहे. लवकरच झेलेन्स्की खुद्द याबाबत माहिती देतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
झेलेन्स्की युक्रेनींचे हिरो
देशाचा राष्ट्राध्यक्ष हातात बंदूक घेऊन युद्धात उतरतो हे क्वचितच घडतं. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष युद्ध सुरू झाल्यापासूनच आपल्या निडरतेसाठी आणि साधेपणासाठी चर्चेत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे गर्विष्ठ आणि निष्ठूर काळजाचे, युद्धाचे खलनायक म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, तर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देताना त्यांच्या विवेकी, धैर्य, शांत आणि आत्मविश्वासाची करिष्माई जादू जगाला दाखवली आहे. मात्र अशी बातमी आता संभ्रम निर्माण करु शकते. युक्रेनकडून मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अजूनही देण्यात आलेली नाही.
Video | युक्रेनियन्सचा हिरो राष्ट्राध्यक्ष असूनही जेव्हा खूर्ची उचलतो आणि पत्रकारांशी हात मिळवतो!
Russia Ukraine War : बॉम्बचं उत्तर ब्लॉकने, बायडेन यांनी पुतीन यांना फेसबुकवर अनफ्रेंड केलं!