AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाची भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का, अमेरिकेत खळबळ

अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशिया आणि भारताची जवळीक वाढत असून, आता रशियानं भारताला सर्वात मोठी ऑफर दिली आहे, रशियाचा हा निर्णय अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

रशियाची भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का, अमेरिकेत खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 05, 2025 | 6:37 PM
Share

रशियाकडून भारतानं कच्च्या तेलाची खरेदी करू नये, म्हणून वारंवार अमेरिकेकडून भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो आणि त्या पैशांचा उपयोग रशिया युद्धासाठी फंड म्हणून करत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे. दरम्यान अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावल्यानंतर आता रशिया आणि भारताची जवळीक आणखी वाढत असल्याचं पहायला मिळत आहे, रशियानं भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीमध्ये देखील मोठी सूट दिली होती, ज्यामुळे भारताचा मोठा फयदा झाला, दरम्यान त्यानंतर आता रशियाकडून भारताला आणखी एक मोठी ऑफर देण्यात आली आहे, रशियाची ही ऑफर अमेरिकेसाठी मोठा धक्का मानली जात आहे.

रशियांच्या या नव्या ऑफरमुळे भारतीय वायुदलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. रशियाने भारताला त्यांच्या Kh-69 स्टेल्थ एअर-लाँच्ड क्रूझ क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करण्याची ऑफर दिली आहे, हे क्षेपाणास्त्र भारताच्या सुखोई 30MKI लढाऊ विमानांवर सहज तैनात करण्यात येऊ शकतं. रशियाकडून नुकताच भारताला हा प्रस्ताव देण्यात आला आहे. रशियाकडून भारताला ज्या मिसाईलचं तंत्रज्ञान हस्तांतरण करण्याची ऑफर देण्यात आली आहे, ती मिसाईल 400 किलोमीटर रेंजची असून, या मिसाईलचं वैशिष्ट म्हणजे या मिसाईलला रडार देखील ट्रॅक करू शकत नाही. ही मिसाईल कमी उंचीवरून उडते, मात्र तरी देखील रडारपासून वाचण्यास समर्थ आहे, या मिसाईलचं वजन जवळपास 710 किलोच्या आसपास आहे.

ही मिसाईल Tactical Missiles Corporation (KTRV) ने विकसीत केली असून, रशियानं या मिसाईलचा उपयोग हा युक्रेनविरोधातील युद्धात देखील केला आहे. या मिसाईलचं वैशिष्ट म्हणजे ही आपल्या लक्ष्याचा सहज वेध घेते, तसेच शत्रूचं रडार या मिसाईलला ट्रॅक करू शकत नाही, या मिसाईलमुळे आता भारताची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून, हा अमेरिकेसोबतच पाकिस्तानला देखील मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.  पुन्हा एकदा रशियानं भारताच्या दिशेनं मैत्रीचा हात पुढे केला असल्याचं पहायला मिळत आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.