उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्रात काय करता येईल? संजय राऊत आणि प्रियंका गांधींची दिल्लीत तासभर खलबतं
शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसोबत खलबतं झाली. राजधानी दिल्लीत जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. उत्तर प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रात काय करता येईल, याबाबत चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींसोबत (Priyanka Gandhi) खलबतं झाली. राजधानी दिल्लीत जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. उत्तर प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्रात काय करता येईल, याबाबत चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले.
प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेली जी चर्चा झाली त्याबाबत त्या राहुल गांधी यांना माहिती देतील. तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेल. काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे. जिथे निवडणुका आहेत तिथे काय परिस्थिती आहे. त्या दहशतीला कशाप्रकारे सामोरं जात आहेत, याची माहिती त्यांनी दिली, असं संजय राऊत यांनी सांगितलं. तर बिपिन रावत यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे. ते लढवय्ये नेते होते, त्यांच्याकडे विनम्रता होती. ते हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित होते. त्याचा असा अपघात होणे हे देशाच्या सुरक्षेला आव्हान असल्याचंही राऊत म्हणाले.
It was a positive meeting. We are thinking of working together in Uttar Pradesh and Goa: Shiv Sena leader Sanjay Raut on his meeting with Congress leader Priyanka Gandhi Vadra in Delhi today pic.twitter.com/42hMtWlJZX
— ANI (@ANI) December 8, 2021
राहुल गांधी आणि संजय राऊतांमध्ये चर्चा
संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यूपीएमध्ये सहभागी होणार का? असा प्रश्न विचारला जातोय. मात्र, राहुल गांधी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलून आणि त्यांनी परवानगी दिली तर मी तुम्हाला माहिती देईल, असं सूचक वक्तव्य राऊत यांनी दिलं आहे.
काही चर्चा चार भिंतीत असतात, त्या वरिष्ठांशीच करायच्या असतात. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंशी बोलून त्यांनी परवानगी दिली तर मी तुमच्याशी बोलेन. राहुल गांधी यांच्याशी आज प्रदीर्घ चर्चा झाली. काही वेळ वेणुगोपालही सहभागी झाले होते. या भेटीत देशपातळीवर अनेक मुद्दे, पाच राज्यातील विधानसभा निवडणुका आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
प्रियंका गांधींकडून उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
आगामी वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. या जाहीरनाम्यातून यूपीत सत्तेवर आल्यास महिलांना नोकरीमध्ये 40 टक्के आरक्षण देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हा जाहीरनामा आज जाहीर केला. आम्ही आज निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. हा जाहीरनामा केवळ स्त्रियांचा जाहीरनामा ठरणार नाही. तर या घोषणापत्रामुळे सत्ता आणि प्रशासनातील महिलांच्या भागीदारीला इतर पक्षही गंभीरपणे घेतील ही अपेक्षा आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
LIVE: Release of ‘Women’s Manifesto’ in Lucknow.
उत्तरप्रदेश कांग्रेस का महिला घोषणा पत्र (शक्ति विधान)
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 8, 2021
इतर बातम्या :