शिवसेना यूपीएत जाणार का? अजून 12 तास शिल्लक, संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट यावर भाष्य केलं.

शिवसेना यूपीएत जाणार का? अजून 12 तास शिल्लक, संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम
संजय राऊत, खासदार, शिवसेना
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 10:49 AM

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची भेट यावर भाष्य केलं. शिवसेना यूपीएत जाणार का यासंदर्भात 24 तासांची मुदत दिली होती 12 तास अजून शिल्लक आहेत, असही राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेबद्दल विचारलं असता त्यांना इतकं गांभीर्यानं का घेता, असं राऊत म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना इतक गांभीर्यानं का घेताय? त्यांची विधानं नैराश्यातून येतात, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना इतकं गांभीर्यानं का घेता? तम्ही देखील त्यांना गांभीर्यानं घेत जाऊ नका अन्यथा तुम्हाला त्रास होईल. माझी उत्तर ऐकून त्यांना त्रास होईल, त्यांच्या प्रकृतीच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. विरोधी पक्षाच्या काळजीपोटी मी उत्तर देत नाही, असं राऊत म्हणाले.

प्रियांका गांधी यांच्यासोबत पहिली राजकीय भेट

राहुल गांधी यांची माझी नेहमी भेट होत असते. महाराष्ट्राच्या घडामोडीसंदर्भात राहुल गांधी माझ्याकडून भेट घेत असतात. प्रियांका गांधी यांना राजकीय घडामोडीसंदर्भात पहिल्यांदाच भेटतोय. त्या काँग्रेसच्या महासचिव आहेत त्यामुळं भेटायला काही हरकत नाही. त्यांनी भेटण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार आज त्यांना भेटणार आहे.

काय करतो ती माहिती उद्धव ठाकरेंना देतो

मी पक्षाचा शिवसैनिक आहे, त्यामुळे इकडे बसून जे काय करतो ते त्यांच्या आदेशानं करत असतो. घडामोडी ज्या घडतात ज्यात आम्ही सहभागी होत असतो ती उद्धव ठाकरेंना देत असतो, असं संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरेंचं काय म्हणनं आहे ते सांगतिलचं ना, ते लवकरच तुमच्याशी संवाद साधतील. महाराष्ट्रात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, लहान घटक पक्ष यांच्या साथीनं सरकार चालवतो. हा मिनी यूपीएचा प्रयोग हा क्रांतिकारक आहे. देशात याची चर्चा सुरु आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

शरद पवार यांच्याशी चर्चा करुन राहुल गांधींना भेटलो

शरद पवार यांच्याशी काल माझी चर्चा झाली. राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. प्रियांका गांधी या काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत. निर्णय प्रक्रियेत त्या सहभागी असतात. त्यांना आमच्याशी एका विषयावर चर्चा करायची असेल तर आमचं ते कर्तव्य आहे, असं संजय राऊत म्हणाले.

लढाई लढताना गट तट, फ्रंट विसरायचं असतं

यूपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे हे सगळ्यांचं म्हणनं आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी एका चांगल्या भावनेनं सांगितलं आहे. जेव्हा आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी, हा फ्रंट तो फ्रटं, गट तट असं न करता जी आघाडी आहे ती मजबूत करायला हवी, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

राहुल गांधी यांनी पुढाकार घेतला असल्यास शरद पवार यांनी पुढाकार घेऊ नये, असं नाही. शरद पवार यांच्या ऊंचीचा नेता देशात नाही. राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा देखील हा विषय समोर आला होता.देशभरात कुठेही एकच आघाडी व्हायला हवी, अशी आमची भूमिका आहे. तर, शरद पवार यांची देखील भूमिका आहे, असं राऊत म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना खासदारांचं निलंबन

राज्यसभेचे 12 खासदार जिथं आंदोलन करत आहेत. तिथं आम्ही आज जाणार आहे. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार उद्या तिथं जातील, असं राऊत म्हणाले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमच्या खासदारांचं निलंबन झालं, असंही ते म्हणाले.

इतर बातम्या:

आता उद्धवजी देशाच्या राजकारणात जाणार म्हणता त्यासाठी फिरावं लागतं बाबा, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर जहरी टीका

बदलला नाही तर आपोआप बदल होईल, भाजप खासदारांना मोदींचा सुचक इशारा, टोपीवरही राजकारण

Sanjay Raut said do not take Chandrakant Patil as seriously and also comment on meeting with Rahul Gandhi and Priyanka Gandhi

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.