AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी आधीच सांगितलं होतं, निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील; आप खासदाराचं ट्विट व्हायरल

वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावूक झाले होते. (Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

मी आधीच सांगितलं होतं, निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील; आप खासदाराचं ट्विट व्हायरल
sanjay singh
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 11:42 AM

नवी दिल्ली: वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी काल भावूक झाले होते. त्यावरून मोदींवर टीका होऊ लागली आहे. आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनीही पंतप्रधानांवर टीका केली आहे. निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील हे मी आधीच सांगितलं होतं, असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भाकिताचं ट्विटही त्यांनी व्हायरल केलं आहे. (Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचं 17 एप्रिलचं ट्विट शेअर करत मोदींवर टीका केली आहे. मी 17 एप्रिल रोजी जे बोललो होतो, ते 21 मे रोजी खरं ठरलं. देशाला एका संवेदनशील आणि नेक व्यक्तीची गरज आहे. ढोगी पंतप्रधानांची नाही. स्वत: रॅली करून कोरोना फैलावायचा आणि नंतर रडण्याचं नाटक करायचं, अशा व्यक्तीची गरज नाही, असं संजय सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हटलं होतं सिंह यांनी

सिंह यांनी 17 एप्रिल रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्याचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या पत्रकार परिषदेत ते मीडियाला उद्देशून बोलत आहेत. तुम्ही थोडी कळ सोसा. लवकरच लाईट, कॅमेरा आणि अॅक्शन सुरू होणार आहे. फक्त थोडी वाट पाहा. ते टीव्हीवर येऊन रडतील. त्यानंतर संपूर्ण देशातील वृत्तवाहिन्या ही बातमी चालवतील. सर्व भावूक झाले… सर्व रडायला लागले… केवळ टाळ्या-थाळ्या वाजवा… खरच देशाचं भलं व्हावं वाटत असेल तर आता या प्रकारातून आपल्याला बाहेर पडावं लागेल, असं सिंह या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.

अन् मोदी भावूक झाले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणासीतील डॉक्टरांशी संवाद साधला होता. आपली लढाई एका अदृश्य आणि धूर्त शत्रूविरोधात आहे. सतत बदलणाऱ्या या शत्रूमुळे आपल्याला सावध राहिलं पाहिजे. लहान मुलांना वाचवणं आवश्यक आहे. त्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगताना मोदी भावूक झाले होते. यावेळी त्यांनी ब्लॅक फंगसपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. या आजारापासून सावध राहून अॅक्शन घ्यायची आहे. संकटाच्या काळात काहीवेळा लोकांची नाराजीही ओढवते. मात्र, तरीही आपल्याला काम करत राहायचं आहे. त्यांचं दु:ख कमी करायचं आहे, असा सल्लाही त्यांनी दिला होता. (Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

संबंधित बातम्या:

स्टॉक नसतानाही लसीकरणास सुरुवात; ‘सीरम’ची केंद्र सरकारवर टीका

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा वेग चक्रीवादळाला लाजवणारा, उद्धव ठाकरे खरंच बेस्ट सीएम : मनसे

Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

(Sanjay Singh taunt on PM Narendra Modi emotional speech to frontline workers in varanasi)

हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक
वैभवी देशमुख वाढदिवशी वडिलांच्या आठवणीने भावुक.
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?
रत्नागिरीच्या खोल समुद्रात होणार मॉक ड्रिल, बघा कशी सुरुये तयारी?.
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'
हल्ल्यानंतर ओवैसी पहिल्यांदा काश्मीरमध्ये; म्हणाले, 'भारत सरकारने ..'.
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?
युद्धाचं सावट, महाराष्ट्रातील ही 3 शहरं अतिसंवेदनशील, विशेष तयारी काय?.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्याला 'सुप्रीम' आदेश काय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत महत्वाची बैठक.
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?
अमरनाथ : बाबा बर्फानीचं घ्या पहिलं दर्शन, यंदा शिवलिंगांची उंची किती?.
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर
पाकिस्तानी सैन्याचा मोठा ताफा भारतीय सीमेच्या मार्गावर.
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन
बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या घरीच केलं जात होतं गांजाचं सेवन.