VIDEO | शाळेच्या बसची आणि कारची धडक, सहा जणांचा जागीचं मृत्यू
Ghaziabad Bus Accident : आज सकाळी एक मोठा अपघात झाला आहे. त्या अपघातामध्ये सहा लोकांचा जागीचं मृत्यू झाला आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दिल्ली : एका शाळेच्या बसचा आणि कारचा भीषण अपघात (School Bus-SUV Crash On Delhi-Meerut Expressway Near Ghaziabad, 6 Dead) झाला आहे. त्यामध्ये सहा जणांचा जागीचं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये तीनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे बसच्या चालकाने बस चुकीच्या बाजून नेल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. जखमी लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात झाल्यापासून तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. हा अपघात गाजियाबादमधील (Ghaziabad) दिल्ली-मेरठ (Delhi-Meerut Expressway) एक्सप्रेस हायवेवरती आज सकाळी झाला आहे. या अपघाताचा एक व्हिडीओ सुध्दा व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-मेरठ एक्सप्रेस हायवेवरती क्रॉसिंग थाना परिसरात ही घटना घडली आहे. शाळेची बस चालक चुकीच्या दिशेने वेगाने घेऊन निघाला होता, त्यामुळे अपघात झाला आहे. कार आणि बसमध्ये इतक्या जोरात टक्कर झाली की, कारमधील मृतदेह कित्येक वेळ त्या गाडीत अडकून पडले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने कटरने दरवाजा काढून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
बसच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक मुलगा आणि दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. अपघात झालेल्या बसमध्ये चालकाशिवाय कोणीचं नव्हतं.
बस चालक सीनएनजी भरुन परत येत होता. त्यावेळी हा अपघात झाला आहे. शाळेतील विद्यार्थी नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची लोकांची चर्चा सुरु आहे.
Heavy collision of school bus and car coming from wrong direction in #Ghaziabad, painful death of 6 people in the car, 2 injured. CCTV Video- #UttarPradesh #India #Accident #BusAccident pic.twitter.com/45X8mKScUI
— Prateek Pratap Singh (@PrateekPratap5) July 11, 2023
खाटू श्यामच्या दर्शनासाठी कुटुंब निघाल होतं
मेरठमधील मवाना परिसरातील एका गावातील कुटुंब खाटू श्यामच्या दर्शनासाठी सकाळी निघालं होतं. कारमध्ये चार व्यक्ती आणि चार मुलं होती. विरुद्ध दिशेने निघालेल्या बसने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. त्यामध्ये पाच लोकांना जागीचं मृ्त्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहेत.