जेव्हा भारताच्या ‘त्या’ एका घोषणेने जग हादरलं होतं, अमेरिकेनेही धास्ती घेतलेली
Homi Jehangir Bhabha Death Anniversary : ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त भारताच्या वैज्ञानिक जडण-घडणीतील महत्वाचा किस्सा जाणून घेऊयात. जेव्हा भारताच्या घोषणेने जग हादरलं होतं... नेमकं काय घडलेलं? वाचा सविस्तर...
मुंबई | 24 जानेवारी 2024 : भारताच्या वैज्ञानिक जडण-घडणीत भारतीय शास्त्रज्ञांचा मोठा वाटा आहे. डॉ. होमी जहांगीर भाभा हे त्या पैकीच एक… भारताच्या अणू विज्ञानातील संशोधनात त्यांचा मोठा वाटा राहिला. आज होमी भाभा यांचा स्मृतीदिन आहे. आज भारत जगातील अणु संपन्न देशाच्या यादीत मोडतो. त्यात डॉ. होमी भाभा यांचा मोठा वाटा राहिला. डॉ. होमी भाभा यांनी एक दावा केला होता. त्यामुळे भारताने जगाला हादरवलं होतं. अमेरिकेनेही धास्ती घेतली होती. भारताच्या या दाव्याची जगभर चर्चा झाली. तो दावा नेमका काय होता? पाहुयात…
‘तो’ दावा नेमका काय?
साल होतं 1961 चं… डॉ. होमी भाभा आणि अमेरिकेच्या लष्कराने जनरल केथेन निकोल्स यांच्यात एक बैठक झाली. यात भाभा यांनी मोठा दावा केला. म्हणाले, भारताने ठरवलं तर भारत एका वर्षाच्या आत अणूबॉम्ब बनवू शकतो. या दाव्याने अमेरिका हादरली. त्यानंतर ऑल इंडिया रेडिओवर बोलताना डॉ. होमी भाभा यांनी पुन्हा एकदा अणुबॉम्ब तयार करण्यावर भाष्य केलं. 1965 साली त्यांनी दावा केला की, पुढच्या 18 महिन्यात भारत अणुबॉम्बची निर्मिती करेन. भाभा यांच्या दाव्याने तत्कालिन पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्यासह जग हादरलं.
होमी भाभा यांनी अणुबॉम्ब बनवण्याची घोषणा केली. भारत त्या दिशेने पावलं टाकू लागला. पण याच काळात भाभा यांचा मृत्यू झाला. या घोषणेनंतर तीनच महिन्यात 24 जानेवारी 1966 ला डॉ. होमी भाभा यांचं निधन झालं. डॉ. भाभा जिनिव्हालसा जात होते. यावेळी विमानाचे क्रु मेंबर आणि प्रवाशांना धरून 117 लोक विमानातून प्रवास करत होते. पण तेव्हाच विमान कोसळलं. या विमान अपघातात प्रवासी दगावले. विमान दुर्घटनेत भाभा यांचा मृत्यू झाला. या विमान दुर्घटनेनंतर विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला नव्हता.