पाकिस्तानला उशीरा जाग, म्हणे, आम्हाला सीमा हैदर हिची चिंता; भारताकडे गयावया

पाकिस्तानची एक महिला सीमा हैदर ही भारतात आली आहे. येथील एका तरुणासोबत तिने लग्न केलं आहे. आपल्या नवऱ्याला सोडून ती पाकिस्तानातून भारतात आल्याने हे प्रकरण सोशल मीडियात चांगलच तापलं आहे.

पाकिस्तानला उशीरा जाग, म्हणे, आम्हाला सीमा हैदर हिची चिंता; भारताकडे गयावया
seema haider sachin meenaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 14, 2023 | 9:28 AM

नवी दिल्ली : पाकिस्तानातून भारतात पळून आलेल्या सीमा हैदरबाबत पाकिस्तानला उशिराने जाग आली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या मीडियात सीमाबाबतच्या चर्चा रंगल्याने पाकिस्तानने अखेर सीमाची दखल गेतली आहे. पाकिस्तान सरकारने तर सीमा हैदर ही पाकिस्तानचीच आहे का ते सिद्ध करण्यास भारताला सांगितलं आहे. तसेच सीमा बाबत चिंता व्यक्त केली आहे. सीमाला संरक्षण द्या, तसेच तिला कौन्सिलर देण्याची मागणीही पाकिस्तानने भारत सरकारकडे केली आहे. भारताकडून अद्याप त्यावर पाकिस्तानला काहीही उत्तर देण्यात आलेलं नाहीये.

सीमा हैदर ही पाकिस्तानातून लपतछपत भारतात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मीडिया आणि सोशल मीडियात तिच्याविषयी बरंच काही लिहून येत आहे. तिची माहिती येत आहे. तिच्या विषयीच्या अनेक शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या सीमा प्रसिद्धीच्या झोतात असून पाकिस्तानी मीडियानेही त्याची दखल घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारही खडबडून जागं झालं आहे.

हे सुद्धा वाचा

नेपाळमध्ये भेटले

2019मध्ये सचिन आणि सीमा पबजी या गेमद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले होते. या वर्षीच मार्चमध्ये सचिन आणि सीमा नेपाळची राजधानी काठमांडूत भेटले होते. या ठिकाणी ते सात दिवस एकत्र राहिले. त्यानंतर त्यांनी गुपचूप लग्नही केलं. त्यानंतर सीमा पाकिस्तानात गेली आणि सचिन भारतात परतला होता. पाकिस्तानात आल्यावर तिने कराची येथील एक प्लॉट तिने 12 लाख रुपयांना विकला. त्यानंतर मुलांना घेऊन नेपाळचा विजा काढून विमानाचं तिकीट काढलं.

दीड महिना राहिली, नंतर तुरुंगात

त्यानंतर ती भारतात आली. भारतात उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये दीड महिना राहिली. त्यानंतर एक पाकिस्तानी महिला तिच्या मुलांसह बेकायदेशीरपणे राहत असल्याचं पोलिसांना कळालं. याची कुणकुण लागताच सचिन आणि सीमा मुलांना घेऊन पळून जाण्याच्या बेतात होते. पण 4 जुलै रोजी त्यांनी हरियाणाच्या वल्लभगड येथे पकडण्यता आलं. दोघांनाही अटक करून लुक्सर तुरुंगात ठेवण्यात आलं.

दोघांनाही जामीन

मात्र, 7 जुलै रोजी जेवर येथील एका न्यायालयाने या दोघांनाही जामीन दिला. जोपर्यंत कोर्टात प्रकरण सुरू आहे, तोपर्यंत सीमा सचिनसोबतच राहील. ती घर बदलणार नाही, असा आदेश कोर्टाने दिला. आता कोर्ट या प्रकरणात जो निर्णय देईल त्यानंतर केंद्र सरकार या विदेशी महिलेबाबतचा पुढचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

पतीची मागणी

सीमा हैदरचा नवरा गुलाम हैदर जखरानी याने मीडियाशी संवाद साधला. माझ्या पत्नीला परत पाकिस्तानात पाठवण्यात यावं, अशी विनंती गुलामने भारत सरकारकडे केली आहे. तर सीमा हट्टाला पेटली आहे. भारत सोडणार नसल्याचं तिने म्हटलं आहे. मी हिंदू धर्माचा स्वीकार करेन. भारतातच सचिनसोबत राहील, असं सीमाने म्हटलं आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.