सीमा हैदर म्हणजे ‘जहर’, सचिन कैसा झिंगूर जैसा, आला ‘हा’ व्हिडिओ…
'लप्पू सचिन, झिंगूर जैसा'ने सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या मिथिलेश भाटीचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी टार्गेट आहे ते सीमा हैदरला भाभी म्हणणारे दीर, या दिरांना मिथिलेशने खरमरीत टोला लगावलाय. काय म्हणाली नेमकं मिथिलेश भाटी...

नोएडा | 13 ऑगस्ट 2023 : पाकिस्तानातून प्रेमासाठी आपल्या चार मुलांसह भारतात आलेली सीमा हैदर हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा तिची क्रेझ कमी नाही. सीमाच नाही तर तिचा पती सचिन याचीही जगभरात चर्चा होतेय. प्रत्येक दिवसाला त्यांच्याशी संबंधित एक एक नवीन माहिती पुढे येत आहे. तर, सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करणाऱ्यांमध्येही भर पडतेय. अशातच आता सीमा हैदर हिच्यासाठीचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात सीमा हैदर हिला चक्क ‘जहर’ अर्थात विष म्हणून हिणवण्यात आलंय.
सचिन हा सीमा हैदर हिच्यासोबत 2020 मध्ये पहिल्यांदा बोलला. तर 10 मार्चला सचिन तिला पहिल्यांदा भेटला होता. त्यानंतर या दोघांनी 13 मार्च रोजी नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरात लग्न केले. हार घालणे ते सिंदूर भरण्यापर्यंतचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, त्यांच्या त्या दाव्याची पडताळणी केल्यानंतर मंदिराच्या रजिस्टरमध्ये त्या दोघांच्या नावाची कोणतीही नोंद आढळून आली नाही.




सीमा आणि सचिन यांच्या नवनव्या दाव्यानंतर आता या जोडीच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सीमा हैदर आणि सचिनच्या लव्हस्टोरीची देशभर चर्चा आहे. तसेच, सचिन याची ग्रेटर नोएडा येथील शेजारी मिथिलेश भाटी या महिलेचाही सोशल मीडियावर बोलबाला आहे.
सोशल मीडियावर मिथिलेश भाटी हिला मीम क्वीन म्हणत आहेत. तिने सचिनसाठी म्हटलेला, ‘लप्पू सा तो सचिन है, झिंगूर जैसा’ हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच गाजला आहे. त्यानंतर मिथिलेश हिने अनेक मीम्स बनवले. त्यात आता आणखी एका रिल्सची भर पडली आहे.
मिथिलेशने भाऊंना विचारा, वहिनी कशी आहे असा एक रिल्स बनवला आहे. त्यावर सीमा हैदर हिच्याबद्दल बोलणाऱ्या मुलांवर तिने एक कमेंट केली आहे. ज्यांना सीमा हैदरचे सौंदर्य आवडले आहे. त्यांना हा खास टॉन्ट तिने मारला आहे. “इधर देख भाभी बात कर रहे देवर, भाभी कैसी है? त्यावर मिथिलेशने ती एकदम जहर आहे. विष आहे. ते चाटल्यानंतर कळेल असा टोला तिने लगावला आहे.
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या मिथिलेश भाटीचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी टार्गेट आहे ती सीमा हैदरची मेहुणी, जी म्हणते की वहिनी पूर्णपणे विष आहे.