माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या सुनेचा भीषण अपघातात मृत्यू, मुलगा मानवेंद्र गंभीर जखमी

दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा अमीन सिंह गंभीर जखमी झाले.

माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांच्या सुनेचा भीषण अपघातात मृत्यू, मुलगा मानवेंद्र गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Jan 31, 2024 | 8:13 AM

जयपूर | 31 जानेवारी 2024 : दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेवर नौगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांची सून आणि माजी खासदार मानवेंद्र सिंह यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा अमीन सिंह हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांवरही अलवर येथील सोळंकी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातामध्ये मानवेंद्र सिंह यांचा ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला. त्याच्यावरही बड़ौदामेव रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यालाही अलवर रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा ही कार मानवेंद्र सिंह चालवत होते आणि त्यांची पत्नी चित्रा सिंह या त्यांच्या बाजूच्या सीटवर बसल्या होत्या. तर मुलगा हमीर सिंह आणि ड्रायव्हर मागच्या सीटवर बसले होते. माजी खासदार मानवेंद्र सिंह हे 2018 साली त्यांच्या पत्नीसह भाजपा सोडून काँग्रेस पक्षात दाखल झाले.

दिल्लीहून जयपूरला जाताना झाला अपघात

बाडमेरचे माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांची पत्नी चित्रा आणि मुलगा हमीर सिंह यांच्यासह दिल्लीहून जयपूरला जात होते. दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावरील 82.8 किमी रसगन आणि खुशपुरी दरम्यान, अचानक कारचे संतुलन बिघडले आणि ती पुलाच्या भिंतीला धडकली. या अपघातात चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. तर मानवेंद्र सिंह आणि त्यांचा मुलगा गंबीर जखमी झाले, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दोघांनाही तत्काळ अलवर येथील सोलंकी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिस शोधणार अपघाताचे कारण

हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरू आहे, असे अतिरिक्त एसपी तेजपाल सिंह यांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती घटनास्थळी मिळताच जखमींना तातडीने अलवर येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी चित्रा सिंह यांना मृत घोषित केले. तर इतरांची प्रकृती चिंताजनक आहे. मानवेंद्र सिंह यांच्या दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यांनाही अलवरला हलवण्यात येत आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजप आणि काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते रुग्णालयात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.