AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने का उचललं टोकाचं पाऊल? स्वतःवरच का गोळ्या झाडल्या?

ओवैसी यांच्या व्याह्याने अशा प्रकारे एकाएकी जीवन संपवल्यामुळे हैदराबादमधील एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. तसेच ओवैसी यांच्या कुटुंबियांनाही जबर धक्का बसला आहे. 

AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या व्याह्याने का उचललं टोकाचं पाऊल? स्वतःवरच का गोळ्या झाडल्या?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 5:28 PM

हैदराबाद  (Hyderabad) येथील खासदार आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांच्या नातेवाईकांबाबत धक्कादायक घटना घडली आहे. ओवैसी यांचे व्याही अर्थात मुलीचे सासरे यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. मजहरुद्दीन अली खान असे त्यांचे नाव असून गंभीर बाब म्हणजे ते व्यवसायाने डॉक्टर होते. घटनेनंतर मजहरुद्दीन यांना तत्काळ हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ओवैसी यांच्या व्याह्याने अशा प्रकारे एकाएकी जीवन संपवल्यामुळे हैदराबादमधील एआयएमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे. तसेच ओवैसी यांच्या कुटुंबियांनाही जबर धक्का बसला आहे.

नेमकी घटना काय?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मजहरुद्दीन खान हे एआयएमआयएमचे प्रमुख औवैसी यांच्या दुसऱ्या मुलीचे सासरे होते. ते एक आर्थोपेडिक स्पेशलिस्टदेखील होते. त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी स्वतःच्या राहत्या घरीच परवाना असलेल्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. यामागे काही कौटुंबिक कारण असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तरीही सदर प्रकरणी सखोल तपास केला जातोय, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कौटुंबिक कलहामुळे घेतला निर्णय?

हैदराबाद येथील वेस्ट झोनचे डीसीपी झोएल डेव्हिस यांनी या घटनेची पुष्टी केली. ते म्हणाले, सोमवारी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास या डॉक्टरांनी स्वतःच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेतली. मजहर यांनी असं अचानक एकाएकी जीवन का संपवलं, यामागे काही कौटुंबिक कारण असू शकतं, असा अंदाज वर्तवला जातोय. घटनास्थळावरून पोलिसांनी संबंधित शस्त्र जप्त केलं आहे. घटना घडली, त्यावेळी मजहरूद्दीन हे घरी एकटेच होते. ते ६० वर्षांचे होते. खान यांनी डोक्याच्या उजव्या बाजूला गोळी झाडून घेतली होती. मजहरुद्दीन यांच्या पुत्राने २०२० मध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या दुसऱ्या मुलीशी विवाह केला होता.

असदुद्दीन ओवैसी हे ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. २००४ पासून ते हेदराबाद येथे खासदार आहेत. असदुद्दीन ओवैसी यांचा नुकताच मुंबई दौरा देखील झाला. एआयएमआयएम पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या अधिवेशनात त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.