इमेजपेक्षा आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं, अनुपम खेर यांची मोदींवर पहिल्यांदाच थेट टीका

प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. (anupam kher narendra modi corona pandemic second wave)

इमेजपेक्षा आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं, अनुपम खेर यांची मोदींवर पहिल्यांदाच थेट टीका
Anupam Kher Narendra Modi
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 10:45 PM

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ( Corona pandemic second wave) संपूर्ण देशाची झोप उडाली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा, ऑक्सिजनची कमतरता अशा गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या सर्व गोष्टींमुळे मागील काही दिवसांपासून मोदी सरकारवर देश-विदेशातून टीका होत आहे. मात्र, आता मोदी यांचे पाठीराखे असणारेसुद्धा आता त्यांच्याविरोधात बोलू लागले आहेत. प्रसिद्ध सिनेअभिनेते अनुपम खेर (Anupam Khe) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर पहिल्यांदाच थेट टीका केली आहे. त्यांनी प्रतिमा संवर्धनापेक्षाही आयुष्यात बरंच काही महत्त्वाचं असतं, असं परखड भाष्य केलं आहे. इंग्रजी वृत्तवाहिनी एनडीटीव्ही (NDTV) वर बोलताना त्यांनी ही टीका केलीये. (senior film actor Anupam Kher criticizes Narendra Modi and central government on Corona pandemic second wave management)

अनुपम खेर यांना कोणता प्रश्न विचारण्यात आला ?

अभिनेते अनुपम खेर हे अभिनय क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. त्यांचे देशात लाखोंनी चाहते आहेत. अनुपम खेर हे मोदी तसेच केंद्र सरकारचे समर्थक असल्याचे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी यापूर्वी मोदी सरकारविरोधी बोलणाऱ्यांना खडे बोलसुद्धा सुनावलेले आहेत. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मोदी सरकारवर देशभरातून टीका होताना दिसतेय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मोदी सरकारने योग्य नियोजन केले नसल्याचा आरोप अनेक बुद्धीवाद्यांकडून होतोय. याबद्दल मत मांडण्यासाठी एनडीटीव्हीने अनुपम खेर यांना बोलावले होते. यावेळी एनडीटीव्हीच्या अँकरने अनुपम खेर यांना एक प्रश्न विचारला. “देशात रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक रुग्णालयासमोर रडताना दिसत आहेत. त्यांना रुग्णालयात प्रवेश दिला जात नाहीये. नदीमध्ये मृतदेह आढळत आहेत. रुग्णांची सगळीकडे धडपड सुरु आहे. अशावेळी सरकारने स्वत:ची प्रतिमा सांभळण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटत नाही का ?” असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर म्हणून अनुपम खेर यांनीसुद्धा परखड मत मांडले.

अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला अनुपम खेर यांनी उत्तर दिले. “सध्या जी टीका होत आहे, ती बऱ्याच उदाहरणांमध्ये सत्य आहे. सध्या ज्या जनतेने सरकारला निवडून दिलेले आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची गरज आहे. सरकारला ज्या कामासाठी निवडून देण्यात आलेले आहे ते काम सरकारने करायला हवे. देशात मृतदेह नदीमध्ये तरंगत असल्याचं दिसतंय. एखादी मानवी मन नसलेली व्यक्तीच ही घटना पाहून दु:खी होणार नाही. सध्या सरकारने प्रतिमा संवर्धन करण्यापेक्षा दुसरंही काही महत्त्वाचं आहे, हे समजून घेण्याची गरज आहे,” असे अनुपम खेर म्हणाले. तसेच पुढे बोलताना काही ठिकाणी केंद्र सरकारने चूक केली आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये जबाबदार धरायला हवे. मात्र, याच गोष्टीचे समोरच्या पक्षाने भांडवल करणेसुद्धा चुकीचे आहे, असेही शेवटी अनुपम खेर म्हणाले.

अनुपम खेर-नरेंद्र मोदी यांचे जिव्हाळ्याचे संबंध

दरम्यान, अनुपम खेर हे यापूर्वी अनेक वेळा पंतप्रधानांची पाठराखण करताना दिसले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अनुपम खेर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जुलै 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनुपम खेर यांनी लिहिले होते, की पंतप्रधान मोदी हे आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. अनुपम खेर सोशल मीडियावर भाजपचे उघडपणे समर्थन करताना दिसतात. त्यांची पत्नी आणि अभिनेत्री किरण खेर चंदिगढमधून भाजपच्या खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर अनुपम खेर यांनी केलेल्या या टीकेला चांगलेच महत्त्व आले आहे.

इतर बातम्या :

लस निर्मिती कंपनी ‘भारत बायोटेक’लाही कोरोनाचा विळखा, कंपनीतील 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

पीएम केअरचा पैसा बाहेर काढा, सेंट्रल विस्टाचं काम थांबवा; 12 विरोधी पक्षांच्या नेत्यांचं मोदींना खुल पत्रं

कोरोनाच्या लस कधी मिळणार? किती मिळणार?; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी अखेर मौन सोडलं

(senior film actor Anupam Kher criticizes Narendra Modi and central government on Corona pandemic second wave management)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.