aryan khan drug case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ
aryan khan drug case | सुपरस्टार शाहरुख खानला धक्का देणारं वृत्त मुंबई कोर्टातून आहे. कारण त्याचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आलीय. म्हणजे आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलीय.
मुंबई : सुपरस्टार शाहरुख खानला धक्का देणारं वृत्त मुंबई कोर्टातून आहे. कारण त्याचा मुलगा आर्यन खान याच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आलीय. म्हणजे आर्यन खानची कोठडी 7 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलीय. आर्यनला काल 1 दिवसाची एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. जी आज संपली. आज पुन्हा त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यावेळेस त्याच कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
आर्यन खान गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेतो, एनसीबीचा दावा
आर्यन खान हा गेल्या चार वर्षापासून ड्र्ग्ज घेतो आणि त्याच्या मोबाईलमधून काही धक्कादायक माहिती समोर आल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी केला होता. ड्रग्जच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठीच आर्यनची कोठडी वाढवण्यात यावी अशी मागणी केली गेली. ती कोर्टानं मंजूर करत आर्यनच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ केली गेलीय.
Cruise ship party case | Mumbai’s Esplanade Court sends Aryan Khan, Arbaz Seth Merchant and Munmun Dhamecha to NCB custody till 7th October pic.twitter.com/mU8wP06Jt4
— ANI (@ANI) October 4, 2021
तब्बल अडीच तास युक्तिवाद, 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी
ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा या तिघांना कोठडी सुनावली. या तिघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
एनसीबीने केली होती कोठडीची मागणी
कोर्टाने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आरोपींच्या कोठडीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोठडी हवी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोर्टाने 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावली.
सतिश मानेशिंदे यांचा कोर्टात नेमका काय दावा?
आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतिश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं
कोर्टात नेमका कोणता युक्तिवाद झाला ?
एनसीबीचे वकील : आर्यनच्या मोबईलमधून धक्कादायक फोटो मिळाले आहेत. तसेच मोबाईल चॅटमधून अनेक पुरावे मिळाले आहेत. क्रूझ पार्टीचं आंततराष्ट्रीय कनेक्शन उघड होत आहे. आर्यनसह नऊ आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी
वकील सतिश मानशिंदे : एनसीबीच्या तपासात आर्यनकडे ड्रग्ज सापडलेलं नाही. अरबाज मर्चंटकडे 6 ग्रॅम ड्रग्ज सापडलं. आर्यनचा ड्रग्ज खरेदी तसेच विक्रीमध्ये काहीही संबंध नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध कसा ? व्हॉट्सअॅप चॅटिंगमुळे ड्रग्ज पेडलर ठरवता येत नाही. व्हॅट्सअॅप चॅट पुरावे म्हणून पाहता येत नाहीत.
shah rukh khan son aryan khan drug case custody extended up to 7 october
इतर बातम्या :
Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा
Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ